फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI)मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये मॅनेजरच्या पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. NHAI मध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदद्वारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात देखील केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या सदंभात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याच्या अगोदर या भरती संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
हे देखील वाचा : विवा महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा; विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आले विविध उपक्रम
NHAI च्या या भरती प्रक्रियेत मॅनेजरच्या रिक्त पदासाठी उमेदवारांना नियुक्त केले जाणार आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी NHAI च्या nhai.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. महत्वाची बाब म्हणजे, या भरती संदर्भात अधिक आणि सखोल माहिती अभ्यासण्यासाठी उमेदवारांनी याच संकेतस्थळाला भेट द्यावी. या भरती संदर्भात जाहीर करण्यात आलेलया अधिसूचनेमध्ये या भरतीला पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्वपूर्ण बाबी नमूद आहेत. यातील अटी शर्ती उमेदवारांना पात्र करणे अनिवार्य आहे.
अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या शैक्षणिक अटीनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून पदवीधर असावा. तसेच अर्ज कर्ता उमेदवार अनुभवी असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे किमान चार वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. प्रशासन, स्थापना किंवा मानव संसाधन क्षेत्रामध्ये अनुभव असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच अधिसूचनेमध्ये उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात असलेल्या अटीनुसार, जास्तीत जास्त ५६ आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
हे देखील वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंताच्या विभिन्न पदासाठी भरती; ‘या’ तारखेपासून करता येईल अर्ज
NHAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, ऑनलाइन फॉर्मची प्रत काढावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे सत्यापित करून निर्दिष्ट पत्त्यावर पाठवावी लागतील. या पत्त्याची माहिती NHAI च्या अधिकृत अधिसूचनेत दिली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.