फोटो सौजन्य - Social Media
भारतीय वायुसेनेमध्ये भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही भारतीय वायुसेनेमध्ये करिअर घडवू पाहत आहात तर हा लेख नक्की संपूर्ण वाचा. भारतीय वायुसेनेने अग्निवीर वायु पदांवरील भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवार 7 जानेवारी 2025 पासून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 27 जानेवारी 2025 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत चालू राहील. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वायुसेनेच्या अधिकृत वेबसाइट (agnipathvayu.cdac.in) वर जाऊन अर्ज भरावा लागेल.
अर्ज करण्याअगोदर उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करणे अनिवार्य आहे. या पात्रता निकषांना पात्र असल्याशिवाय उमेदवारांना अर्ज प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार नाही. या अटी शर्ती अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. एकंदरीत, या भरतीसाठी किमान वय १७.५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त २१ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी शैक्षणिक अट देण्यात आले आहे कि अर्ज कर्ता उमेदवार १२वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर उमेदवाराने गणित, भौतिकशास्त्र तसेच इंग्रजी विषयांत किमान ५०% गुण मिळवले असावे.
निवड प्रक्रियेमध्ये दोन टप्प्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन लिखित परीक्षा 22 मार्च 2025 पासून आयोजित केली जाईल. परीक्षा सुरू होण्याच्या 24-72 तास आधी उमेदवारांना ईमेलद्वारे प्रवेशपत्र पाठवले जाईल. परीक्षेत नकारात्मक गुणदान (निगेटिव्ह मार्किंग) लागू असेल. तसेच उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहावे लागेल आणि उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. पुरुष उमेदवारांसाठी 1.6 किमी धाव 7 मिनिटांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. तर महिला उमेदवारांसाठी 1.6 किमी धाव 8 मिनिटांत पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. परीक्षेसाठी अर्ज करताना उमेदवारांना 550 रुपये शुल्क + जीएसटी भरावे लागणार आहे. तांत्रिक कारणामुळे शुल्क एकाधिक वेळा कट झाल्यास जादा रक्कम परत केली जाईल.
1. अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर जा.
2. होमपेजवर अर्ज लिंकवर क्लिक करा.
3. आवश्यक माहिती भरून अर्ज जमा करा.
4. भविष्यातील उपयोगासाठी अर्जाचा प्रिंटआउट घेऊन ठेवा.