फोटो सौजन्य - Social Media
सर्वोच्च न्यायालयामध्ये भरतीचे आयोजन करण्यात आले होते. कायदा क्षेत्रामध्ये करिअर घडवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी होती. विशेष बाब म्हणजे या भरतीतून नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला सुप्रीम कोर्टामध्ये काम करता येणार होते. अर्ज कर्त्या उमेदवारांनी महत्वाची बाब लक्षात घ्यावी कि भरती सर्वोच्च न्यायालयाची असल्याने कामाचे ठिकाण नवी दिल्ली निश्चित करण्यात आले होते. एकूण १०७ रिक्त जागांसाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये ३१ रिक्त जागा कोर्ट मास्टर पदासाठी आहे. ३३ जागा सिनिअर पर्सनल असिस्टंट पदासाठी आहे तर ४३ जागा पर्सनल असिस्टंट पदासाठी आहे. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार होते. एकंदरीत, अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या sci.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिली होती.
सुप्रीम कोर्टाने ३ डिसेंबर २०२४ रोजी या भरती संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर केली होती. तसेच या भरतीसाठी उमेदवारांना ४ डिसेंबर २०२४ पासून अर्ज करता येणार होते. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर निश्चित करण्यात आली होती. परंतु, महत्वाची बातमी अशी आहे कि अर्ज कर्त्या उमेदवारांना टायपिंग टेस्टसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. २१ जानेवारी २०२५ रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज नोंदवला आहे. चला तर मग जाणून घेऊयात सुप्रीम कोर्टाच्या या भरतीविषयक सखोल माहिती:
उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही अटी शर्ती पात्र करावे लागले होते. या अटी शर्ती उमेदवाराच्या शिक्षणा संबंधित होते, तर त्यांच्या वयोमर्यादे संबंधित आहेत. कोर्ट मास्टरच्या पदासाठी अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले होते. तर जास्तीत जास्त ४५ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. सिनिअर पर्सनल असिस्टंटच्या पदासाठी किमान वय १८ तर कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले होते. तर पर्सनल असिस्टंट्च्या पदासाठी किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले होते. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज नोंदवला होता.
एकूण पाच टप्प्यांमध्ये उमेदवाराची नियुक्तीची प्रक्रिया पार पडणार आहे. या सर्व टप्प्यांना उपस्थित राहून पात्र करणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. यामध्ये उमेदवाराच्या कौशल्यांची चाचणी घेण्यात येईल. तसेच उमेदवाराला लेखी परीक्षा, मुलखात, दस्तऐवजांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसारख्या टप्प्यांना पात्र करावे लागणार आहे.