फोटो सौजन्य - Social Media
एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ सुपरवाईजर भरतीसाठी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांची भरती करवण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ पाहणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ सुपरवाईजरच्या या भरती प्रक्रियेला १३ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. या पदासाठी अनेक उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज नोंदवले आहेत. मुळात, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज नोंदवू इच्छुक आहात तसेच तुम्हाला एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ सुपरवाईजर पदासाठी काम करण्याची इच्छा आहे तर प्रतीक्षा कसली करत आहात? मुदत संपण्यागोदर आपल्या अर्जाची अंमलबजावणी करा म्हणजेच अर्ज नोंदवून घ्या. इच्छुक असलेल्या उमेदवारांना डिसेंबरच्या १२ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : रक्कम लाखोंची येईल खिशात, फिरून देशविदेशात; बेस्ट करिअर ऑप्शन
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करत आहात तर तत्पूर्वी या अधिसूचनेचा एकदा आढावा घेऊन ठेवा. या अधिसूचनेमध्ये या भरती प्रक्रियेसंदर्भात सखोल माहिती नमूद आहे. या भरतीसाठी पुरुष तसेच महिला उमेदवार दोन्ही अर्ज करू शकतात. तसेच या भरतीच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या उमेदवारास २०,००० रुपये ते ३८,००० रुपये दरमाह वेतन मिळेल. या भरतीची खास बात म्हणजे या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क जात नाही आहे,. एकंदरीत, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क आहे.
जाहीर झालेल्या अधिसूचनेमध्ये या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना काही अटी शर्तीची पात्रता करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. या अटी शर्ती मुख्यता शैक्षणिक तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. एकंदरीत, या भरतीसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे. तर जास्तीत जास्त ३४ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जर तुमचे वय या वयोगटाच्या दरम्यान आहे तर वयोमर्यादेनुसार तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात. परंतु, शैक्षणिक अटीला पात्र असणेही आवश्यक आहे. अर्ज कर्ता उमेदवार कोणत्याही मान्यता पात्र संस्थेतून बारावी उत्तीर्ण असावा.
हे देखील वाचा : मातोश्री वसतिगृहाला आवश्यक सेवा-सुविधांसाठी निधी देणार- मंत्री दादाजी भुसे
या भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येणार नाही आहे. मुलाखतीच्या जोरावर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. अधिक सखोल माहिती अभ्यासणासाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेचा आढावा घ्यावा.