जर तुम्हाला उंच उडण्याची आवड आहे, तर नक्कीच हा करिअरचा पर्याय तुमच्यासाठी आहे. उंचीशी तसेच हवेशी नाते जपण्यासाठी आपल्याला पायलट बनावे लागेल. पायलटची नोकरी भरभरून पैसेही मिळवून देते, त्याचबरोबर अनेक नवीन आणि थरारक अनुभवदेखील मिळवून देते. जर तुम्हाला थरारक गोष्टी करायला आवडतात, तर नक्कीच तुम्ही पायलट म्हणून करिअर घडवण्याचा विचार करावा. पायलट बनण्याची अनेकांची इच्छा आहे, परंतु बनतात कसे? फार कुणाला माहिती नाही.
पायलट म्हणून भविष्य घडवायचे आहे? जाणून घ्या, या करिअर ऑप्शनबद्दल. (फोटो सौजन्य - Social Media)
पायलट बनण्यासाठी दहावी आणि बारावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे, १२ वीमध्ये पीएसीएम या विषयातून अभ्यास करा तसेच इंग्रजीवर चांगली पकड असुद्या.
उमेदवाराकडे मानसिक स्थिरता, शारीरिक फिटनेस, लीडरशिप, पर्यावरणाविषयी जागरूकता तसेच तंत्रज्ञानावर पकडसारखे कौशल्य असणे फार महत्वाचे आहे.
पायलट बनण्यासाठी पायलट ट्रेनिंग कोर्स करणे अनिवार्य आहे. जर तुमची भारतीय वायुसेनेमध्ये रुजू होण्याची इच्छा आहे, तर NDA ची परीक्षा पास करणे भाग आहे.
या कोर्समध्ये विमान तसेच हेलिकॉप्टर उड्डाण करण्याचे तंत्र शिकवले जाते, त्याचबरोबर अभियांत्रिकी आणि स्पेस अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राविषयी माहिती दिली जाते.
या क्षेत्रामध्ये वेतन खूप असतो. मुळात, पायलटच्या अनुभवावरून त्याचा पगार निश्चित केला जातो.