फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल आर्म पोलीस फोर्समध्ये मेडिकल ऑफिसरच्या पदासाठी ३४५ जागा शिल्लक आहेत. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसने या भरती संदर्भांत अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या १६ तारखेपासून या भरतीला सुरुवात करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवारांनी ITBP च्या recruitment.itbpolice.nic.in. या अधिकृत संकेस्थळाला भेट द्यावी. अद्याप, या भरतीच्या निवड प्रक्रियेत घेण्यात येणाऱ्या परीक्षेची दिनांक प्रदर्शित करण्यात आली नाही आहे.
हे देखील वाचा : निवृत्त बॅंक कर्मचारी होणार डॉक्टर, 64 व्या वर्षी मिळविले नीट परीक्षेत दैदिप्यमान यश
ITBP च्या या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. जनरल प्रवर्गातून, OBC प्रवर्गातून तसेच EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि ESM प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. तर महिला प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांकडून देखील अर्ज शुल्क म्ह्णून एकही रुपया आकाराला जाणार नाही आहे. उमेदवारांना अर्ज नेट बँकिंग, UPI सारख्या ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे.
उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना काही अटी शर्तींचे पालन करावे लागणार आहे. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणासंदर्भात आहेत. तसचे एका ठराविक वयोवगटातील उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकंदरीत, विविध पदांसाठी अटी वेगवेगळ्या आहेत. परंतु, यातील सामान्य बाब म्हणजे किमान १८ वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त पदानुसार 30/35/40/50 वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
हे देखील वाचा : ‘या’ भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; टेक्निशियन पदासाठी होती भरतीची प्रक्रिया
ITBP ने आयोजित केलेल्या या भरतीच्या प्रक्रियेमध्ये Super Specialist Medical Officers च्या पदासाठी ५ रिक्त जागा असून या पदासाठी अर्ज कर्त्या उमेदवाराकडे किमान तीन वर्षांचे अनुभव असणे आवश्यक आहे, तसेच अर्ज कर्ता उमेदवार MBBS मध्ये पदवीधर असावा. Specialist Medical Officers च्या पदासाठी १७६ जागा रिक्त असून उमेदवाराकडे किमान दीड वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे, तसेच अर्ज कर्ता उमेदवार MBBS मध्ये पदवीधर असावा. MBBS मध्ये पदवीधर असलेले उमेदवार मेडिकल ऑफिसरच्या १६४ पदांसाठीही अर्ज करू शकतात.