फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने (RRB) टेक्निशियन विभागातील विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. या भारतीसंदर्भातील अधिकृत अधिसूचना २७ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. अखेर या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख येऊन ठेपली आहे. २ ऑक्टोबरला या भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांनी सुरुवात केली होती. या भरतीमध्ये अनेक उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवण्यासाठी या भरतीमध्ये अर्ज केला आहे. तरी, अद्याप कुणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्याचा राहिला असेल किंवा अर्ज करण्याची इच्छा असेल तर आज शेवटची मुदत आहे. यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
हे देखील वाचा : विवा महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स कार्यशाळा; प्राध्यपकांचा भरघोस प्रतिसाद
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने या भरतीचे आयोजन केले होते. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना भारतीय रेल्वेमध्ये नियुक्ती मिळवता येईल. भारतीय रेल्वेतील तांत्रिक विभागातील ही भरती प्रक्रिया आहे. भारतीय रेल्वेतील एकूण १४,२९८ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. टेक्निशिअनच्या पदासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. भारतीय रेल्वेमध्ये सरकारी क्षेत्रात जॉब करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावे.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने आयोजित केलेल्या या भरतीच्या प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्तींना पात्र करावे लागणार आहे. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणासंदर्भात आहेत, तसेच काही ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे. भारतीय रेल्वेच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दहावी पास असणे अनिवार्य आहे. तसेच अर्ज कर्ता उमेदवाराकडे ITI प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ निश्चित करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त ३३ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
हे देखील वाचा : टाऊन प्लॅनर भरतीसाठी सुरुवात; MPSC ची बंपर भरती, त्वरित करा अर्ज
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावे लागणार आहे. मुळात, या अर्जच प्रक्रियेत कोणत्याही प्रवर्गातून येणाऱ्या महिला उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. तर अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि PH प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील या भरतीसाठी २५० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. जनरल, ओबीसी तसेच EWS आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहे.