फोटो सौजन्य - Social Media
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)ने विविध विभागांमध्ये ऑपरेटरच्या पदासाठी भरती प्रकिया आयोजित केली आहे. या भरतीच्या माध्यमातून अनेक उमेदवारांना HAL साठी काम करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार या भरतीमध्ये सहभाग घेऊ इच्छुक आहेत. जर तुम्हालाही HAL साठी काम करण्याची इच्छा आहे तर नक्कीच या भरती प्रकियेचा लाभ घ्या. उमेदवारांना ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना वेळेच्या मर्यादेत अर्ज करावे असे निर्देश HAL ने दिले आहेत, अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
हे देखील वाचा :‘या’ नोकरीसाठी लिखित परीक्षा देण्याची गरज नाही; महिन्याला कमवाल लाखोंची रक्कम
HAL ने आयोजित केलेल्या या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेचा आढावा घेत उमेदवार आपली अर्ज प्रकिया पूर्णत्वास आणू शकता. एकंदरीत, उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर या भारतीविषयक सखोल माहितीसाठी अधिसूचनेचा अभ्यास करावा. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन स्वरूपात आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.hal-india.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या भरतीमध्ये विविध विभागातील पदांचा विचार केला जाणार आहे.
ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/मेकेनिकल/कैमिकलसाठी १८ रिक्त पदे, ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/टर्निंग/फिटिंग/वेल्डिंगसाठी १६ रिक्त पदे, ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्ससाठी ४४ रिक्त पदे, ऑपरेटर इलेक्ट्रोप्लेटिंग/लॅबसाठी ०२ रिक्त पदे तर ऑपरेटर वेल्डिंगसाठी ०१ रिक्त जागा आहे. या पदांसाठी इओच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकर आपले अर्ज नोंदवावे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक अटी पदावर निर्भर आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराची संबंधित क्षेत्रामध्ये NAC/ITI/ इंजीनियरिंग डिप्लोमा/B.Sc पूर्ण असावा. या भरतीसाठी अर्ज करू पाहणऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यदा २८ निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवगातील उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमणानामध्ये सूट देण्यात येईल.
हे देखिल वाचा : पश्चिम रेल्वेमध्ये अप्रेंटीसच्या विविध पदांसाठी भरतीला सुरुवात; आजच करा अर्ज
लिखित परीक्षेच्या माध्यमातून उमेदवाराची नियुक्ती केली जाईल. ही लिखित परीक्षा दीड तासांची असेल, या परीक्षेमध्ये जनरल अवेयरनेस, इंग्लिश, रीजनिंग तसेच डिसीप्लीन संबंधित प्रश्न विचारणे जाईल. सामान्य क्ष्रेणीतील तसेच OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना ६०% गुणांनी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे तर SC /ST तसेच PWD प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५०% गन आणणे बंधनकारक आहे. अर्ज करताना उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेचा आढावा घावा.