फोटो सौजन्य - Social Media
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ने भरतीच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जर तुम्हाला ONGC साठी काम करण्याची इच्छा आहे, तसेच संबंधित पदासाठी जर तुम्ही पात्र आहात तर नक्कीच तुम्ही या भरती प्रक्रियेचा विचार नक्की केला पाहिजे. ONGC ने भरतीच्या सुरुवातीच्या काही दिवसांआधी या भरती प्रक्रिये संदर्भामध्ये अधिकृत अधिसूचना जाहीर केली होती. जर तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यास इच्छुक आहात, तर तुम्ही नक्कीच या भरती प्रक्रिये संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचबनेचा आढावा घ्यावा. या अधिसूचनेमध्ये या भरती प्रक्रियेविषयी सखोल माहिती आहे.
हे देखील वाचा : ITI मधील अनुभवी तासिका निदेशकांसाठी, मंत्री मंगल प्रभात लोढांचा महत्वाचा निर्णय
ONGC ने आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून मेडिकल ऑफिसर फील्ड ड्यूटी (FMO), मेडिकल ऑफिसर, मेडिकल ऑफिसर सर्जरी, मेडिकल ऑफिसर नेत्र विज्ञान आणि मेडिकल ऑफिसर ENT पदाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केले आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी २९ सप्टेंबर तारखेच्या अगोदर आपले अर्ज नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
ONGC द्वारे आयोजित या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहे. त्याआधी उमेदवारांना काही अटी शर्तींना पात्र असणे फार महत्वाचे आहे. या अटी शर्ती शैक्षणिक तसेच वयोमर्यादेसंबंधित आहेत, तसेच अधिसूचनेमध्ये नमुद आहेत. विविध पदांसाठी अटी वेगवेगळ्या आहेत. याचा आढावा घेण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा अभ्यास करावा. निवडप्रक्रियेमध्ये उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लिखित परीक्षा द्यावी लागणार नाही आहे. मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी त्यांचे दस्तऐवज आणावे.
हे देखील वाचा : सगळ्यात जास्त कमाई करून देणारे ५ डिग्री; वेतन मिळेल अपेक्षेच्या बाहेर
सुंत्रानुसार, मेडिकल ऑफिसर फील्ड ड्यूटी (FMO) या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमाह वेतन १,०५,००० रुपये इतके मिळण्याची शक्यता आहे. तर मेडिकल ऑफिसर, मेडिकल ऑफिसर सर्जरी, मेडिकल ऑफिसर नेत्र विज्ञान आणि मेडिकल ऑफिसर ईएनटी या पदांसाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला १,३०,००० मासिक वेतन मिळण्याची शक्यता आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा जरूर घ्यावा.