भारत सरकारच्या अंतरिक्ष विभागात ‘या’ पदांसाठी भरती; ... 2 लाख 46 हजार रुपये मिळेल पगार!
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकार अंतरिक्ष विभाग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक, सहायक संचालक आणि विभाग अधिकारी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव – भारत सरकार, अंतरिक्ष विभाग
रिक्त असलेली पदे
1. उपसंचालक
2. सहायक संचालक
3. विभाग अधिकारी
एकूण रिक्त पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024
वयोमर्यादा – 50 वर्ष
भरतीचा तपशील?
उपसंचालक – 04 रिक्त जागा
सहायक संचालक – 09 रिक्त जागा
विभाग अधिकारी – 02 रिक्त जागा
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता?
– उपसंचालक – B.E. / B.Tech. OR M.Sc. with minimum 65% marks or 6.84 CGPA from a recognized University OR equivalent qualification.
– सहायक संचालक – B.E. / B.Tech. OR M.Sc. with minimum 65% marks or 6.84 CGPA from a recognized University OR equivalent qualification.
– विभाग अधिकारी – Degree in Law with 1st Class from recognised University or equivalent.
किती मिळणार पगार?
– उपसंचालक – 2,46,780 रुपये प्रति महिना
– सहायक संचालक – 1,52,640 रुपये प्रति महिना
– विभाग अधिकारी – 91,080 रुपये प्रति महिना
कसा कराल अर्ज?
भारत सरकार अंतरिक्ष विभाग अंतर्गत उपसंचालक, सहायक संचालक आणि विभाग अधिकारी पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 असणार आहे. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. असे भारत सरकार अंतरिक्ष विभागाकडून जाहिरातीत नमुद करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात – https://missionmpsc.com/wp-content/uploads/2024/08/IN-SPACe_Advertisement_lateral-Entry_English_v3.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.inspace.gov.in/inspace?id=inspace_register
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.inspace.gov.in/inspace ला भेट द्या.