IRDAI मध्ये असिस्टंट मॅनेजर पदाच्या 49 जागांसाठी भरती; 89,150 रुपये प्रति महिना मिळणार पगार
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण या भारतातील विमा क्षेत्रावर कायद्यांचे नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेमध्ये मोठी भरती निघाली आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून अधिकृतरित्या जाहिरात काढण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट मॅनेजर पदाच्या एकूण 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण
रिक्त असलेले पद – असिस्टंट मॅनेजर
एकूण रिक्त पद संख्या – 49 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2024
हेही वाचा – मुंबई महापालिकेत जम्बो भरती, लिपिक पदाच्या 1846 जागा भरल्या जाणार; आत्ताच करा अर्ज…
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
असिस्टंट मॅनेजर – 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60 टक्के गुणांसह पदवीधर+ ACA / AICWA / ACMA / ACS/CFA किंवा B.E/B.Tech (Electrical / Electronics / Electronics and Communication / Information Technology / Computer Science/ Software Engineering)/किंवा MCA असणे आवश्यक आहे.
काय आहे वयोमर्यादा
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे असावे.
2. SC/ST साठी : 05 वर्षे सूट असेल.
3. OBC साठी : 03 वर्षे सूट असेल.
किती असेल परिक्षा शुल्क
1. जनरल/ओबीसी/EWS साठी : 750 रुपये
2. SC/ST/PWD साठी : 100 रुपये
किती मिळणार पगार
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण या भारतातील विमा क्षेत्रावर कायद्यांचे नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेमध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर निवड झाल्यास, संबंधित उमेदवाराला 44,500 रुपये ते 89,150 रुपये दरमहा पगार मिळणार आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
कसा कराल अर्ज
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण या भारतातील विमा क्षेत्रावर कायद्यांचे नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेमध्ये होणाऱ्या असिस्टंट मॅनेजर पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती भरा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 असणार आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – https://drive.google.com/file/d/1gWNjBZhYJqLNt8LTMhHhPPcgyaF-uyf7/view
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://ibpsonline.ibps.in/irdaijun24/
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://irdai.gov.in/ ला भेट द्या.