फोटो सौजन्य - Social Media
बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीची संधी शोधात आहात किंवा रोजगाराच्या शोधात आहात तर या भरतीवर लक्ष नक्की टाका. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांना विविध पदांसाठी नियुक्त केले जाणार आहेत. बँक ऑफ इंडियाने या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ऑफिस असिस्टंट, FLC काउंसलर तसेच वॉचमनच्या रिक्त पदांसाठी हे भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मुळात, ही अधिकृत अधिसूचना BOI ने जाहीर केली आहे. अर्ज करण्याअगोदर अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी या अधिसूचनेचा सखोल अभ्यास करावा. जेणेकरून, अर्ज करताना कोणत्याही प्रकारचे अडथळे उदभवणार नाहीत.
हे देखील वाचा : रयत शिक्षण संस्थेमध्ये भरतीला सुरुवात; ‘या’ तारखापर्यंत करता येईल अर्ज, नोकरीचे ठिकाण मुंबई
या अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, उमेदवारांना ऑक्टोबरच्या १९ तारखेपर्यंत अर्ज नोंदवता येणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या वेळेच्या मर्यादेच्या आतच अर्ज नोंदवावेत असे आवाहन BOI ने केले आहे. या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसेच वयोमर्यादे संबंधित आहेत. विविध पदांसाठी विविध शैक्षणिक अटी जाहीर करण्यात आली आहे, त्या जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
तर ऑफिस असिस्टेंटच्या रिक्त पदासांठी अर्ज करू पाहणारा उमेदवार किमान २२ वर्षांचा असला पाहिजे. तर जास्तीत जास्त ४० वर्षे वय असलेले उमेदवार ऑफिस असिस्टेंटच्या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. FLC काउंसलरच्या रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय ६३ असणे अपेक्षित आहे. तर वॉचमनच्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय २२ वर्षे आणि जास्तीत जास्त वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : 29 हजार 550 कोटींच्या प्रकल्पांना मान्यता, 38 हजारांहून जास्त रोजगार निर्मिती होणार !
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अधिसूचनेतून अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा आणि त्याला काळजीपूर्वक व लक्षपूर्वक भरून घ्या. भरलेला अर्जच फॉर्म पुढील प्रक्रियेसाठी
‘झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, हरदोई आंचलिक कार्यालय, ८४९, पहिला मजला, अवस्थी कॉम्पलेक्स, शाहजहांपुर रोड, डीएम चौराहा, हरदोई.’ या पत्त्यावर पाठवायचे आहे. महत्वाची बाब अशी आहे कि वॉचमनच्या कामासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला माळ्याचे काम माहिती असणे अनिवार्य आहे.