फोटो सौजन्य - Social Media
विद्युत विभागात भरतीला सुरुवात होणार आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये या भरती विषयक सर्व महत्वाच्या बाबी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही विद्युत विभागात काम करण्यास इच्छुक आहात तर नक्कीच या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व बाबी वाचून, त्या लक्षात घेऊन अर्जाच्या प्रक्रियेस सुरुवात करावी. मुळात, या भरतीसाठी अर्ज करण्यास स्त्री तसेच पुरुष दोन्ही उमेदवार सक्षम आहेत. या भरतीमध्ये माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती ऑफिस असिस्टंट, ज्युनिअर इंजिनिअर असिस्टंट मॅनेजर तसेच लाईन ऑपरेटरच्या पदासाठी आहे. एकूण 2573 रिक्त जागांना भरण्यासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
२४ डिसेंबरपासून या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच २३ जानेवारी २०२५ या तारखेपर्यंत अर्ज करण्याची विंडो खुली असणार आहे. मुळात, या भरतीसाठी अर्ज नोंदवू पाहणार्या उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र असणे अनिवार्य आहे. किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादा अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी जास्तीत जास्त ४० वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
एकंदरीत, सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १२०० रुपये भरायचे आहेत. OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखिल अर्ज शुल्क म्हणून १२०० रुपयांची भरपाई करायची आहे. SC तसेच ST या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ६०० रुपये भरायचे होते. या भरतीच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत चार टप्प्यांचा समावेश आहे. नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथम लिखित परीक्षा पार करावी लागणार आहे. तसेच उमेदवारांचे कौशल्क्य तपासणीसाठी त्यांच्या कौशल्याची चाचणी ( स्किल टेस्ट ) घेण्यात येणार आहे. यानंतर, उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच अंतिम लिस्ट जाहीर होणार आहे.
वीज विभाग भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत (स्टेप्स):