पुण्यात नोकरीची मोठी संधी, अडीच लाखापर्यंत मिळेल पगार; वाचा... सविस्तर जाहिरात!
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे या ठिकाणी नोकरीची मोठी संधी आहे. तुम्ही महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहसंचालक, केंद्रप्रमुख, व्यवस्थापक (खाते) पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी
रिक्त असलेले पद – सहसंचालक, केंद्रप्रमुख, व्यवस्थापक (खाते)
एकुण पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
हेही वाचा – भारत सरकारच्या अंतरिक्ष विभागात ‘या’ पदांसाठी भरती; … 2 लाख 46 हजार रुपये मिळेल पगार!
कुठे पाठवाल अर्ज
E-MAIL ID – recruitment@msfda.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
भरतीचा तपशील
सहसंचालक – 01 रिक्त जागा
केंद्रप्रमुख- 02 रिक्त जागा
व्यवस्थापक (खाते) – 01 रिक्त जागा
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
– सहसंचालक – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर
– केंद्रप्रमुख – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर
– व्यवस्थापक (खाते)- वाणिज्य/CA/ICWA मध्ये पदव्युत्तर पदवीधर किंवा व्यवस्थापक, लेखा पर्यवेक्षक किंवा वित्त व्यवस्थापक म्हणून लेखामधील किमान 07 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक किंवा संबंधित कोणत्याही विषयातील पदवी
किती मिळणार पगार
– सहसंचालक – 1,75,000 ते 2,50,000 प्रति महिना
– केंद्रप्रमुख – 1,00,000 ते 1,50,000 प्रति महिना
– व्यवस्थापक (खाते) – रु.75,000 प्रति महिना (अनुभव आणि पात्रतेनुसार)
कसा कराल आपला अर्ज
महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी अंतर्गत सहसंचालक, केंद्रप्रमुख, व्यवस्थापक (खाते) पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 असणार आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. असे महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी आपल्या जाहिरातीत म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात – https://msfda.ac.in/wp-content/uploads/2024/08/MSFDA-Recruitment-advertisement_21.08.2024.pdf
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://msfda.ac.in/ ला भेट द्या.