फोटो सौजन्य - Social Media
एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ३० डिसेंबर २०२४ पासून या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तर २८ जानेवारी २०२५ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ज्युनिअर असिस्टंट फायर सर्व्हिसच्या रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना aai.aero या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्जाचा फॉर्म भारण्यागोदर उमेदवारांनी सर्व पात्रता निकषांना तपासून घ्या. चला तर मग जाणून घेऊयात, या भरती संबंधित पात्रता निकषांविषयी:
या भरतीसाठी असणारे पात्रता निकष शैक्षणिक आहेत. तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराने Mechanical / Automobile / Fire या क्षेत्रात डिप्लोमा धारक असावा. तसेच उमेदवाराकडे व्हॅलिड ड्राइविंग लायसन्स असणे अनिवार्य आहे. किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित उमेदवारांना शासनाच्या नियंमानुसार वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
अर्ज फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट aai.aero ला भेट द्यावी लागेल. या वेबसाइटच्या होम पेजवर “करिअर” विभाग आहे, जिथे भरतीशी संबंधित माहिती उपलब्ध आहे. त्या विभागात जाऊन संबंधित भरतीसाठी Registration Link शोधा आणि त्यावर क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे “To Register” च्या समोरील Click here लिंकवर क्लिक करणे आवश्यक आहे. यानंतर, उमेदवारांनी आपल्या सर्व मागितलेल्या तपशीलांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर Already Registered? To Login पर्यायावर क्लिक करुन लॉगिन करावे आणि पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सादर करण्याआधी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंटआउट काढून ठेवणे फायदेशीर ठरेल, जो भविष्यातील उपयोगासाठी उपयुक्त ठरू शकतो.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे, जे प्रत्येक श्रेणीनुसार वेगळे आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹१००० भरावे लागते. याचप्रमाणे, OBC (इतर मागासवर्गीय) तसेच EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) प्रवर्गातील उमेदवारांनाही अर्ज शुल्क म्हणून समान रक्कम भरावी लागते. मात्र, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे, ज्यामुळे या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. अशा प्रकारे, विविध प्रवर्गांसाठी शुल्क संरचना लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
वरील सर्व पायऱ्या काळजीपूर्वक पूर्ण केल्यास उमेदवारांचा अर्ज यशस्वीरित्या सादर केला जाईल आणि भरती प्रक्रियेसाठी पुढील टप्प्यात प्रवेश मिळवणे सोपे होईल.