फोटो सौजन्य - Social Media
इंडस्ट्रिअल डेव्हलोपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) ने भरतीला सुरूवात केली आहे. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये बॅंकिंग क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही बॅंकिंग क्षेत्रामध्ये काम करण्यास तसेच या क्षेत्रामध्ये नोकरीच्या शोधात आहात तर या भरतीसाठी अर्ज करा. एकूण 500 ज्युनिअर असिस्टंट मॅनेजरच्या ग्रेड O तसेच स्पेशलिस्ट ॲग्री असेट ऑफिसर पदाच्या 100 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकंदरीत, 600 रिक्त पदांसाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिला तसेच पुरुष दोन्ही वर्ग या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
संपूर्ण भारतभर या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुळात, या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना idbibank.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. मुळात, उमेदवारांना 50,000 रुपये दरमहा वेतन मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना 21 नोव्हेंबरपासून अर्ज करायचे आहे. तसेच अर्ज एका ठराविक मुदतीपर्यंत करायचे आहे. एकंदरीत, 30 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भात परीक्षेचे आयोजन डिसेंबर 2024 तसेच जानेवारी 2025 मध्ये करण्यात येणार आहे. या बाबत माहिती पुरविण्यात येईल.
IDBI च्या या भरती प्रक्रियेत अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. जनरल तसेच ओबीसी या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना 1,050 रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तसेच EWS प्रवर्गातील उमेदवारांना देखील सारखेच अर्ज शुल्काची भरपाई करावी लागणार आहे. SC तसेच ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी 250 रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे तसेच PWD उमेदवारांनाही अर्ज शुल्क म्हणून 250 रुपयांची भरपाई करायची आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र कराव्या लागणार आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. JAM Grade O Generalist च्या पदासाठी अर्ज करण्यास उमेदवार कोणत्याही क्षेत्रात किमान 60% पदवीधर असावा. तर उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावे. तर SC, ST, PWD वर्गातून येणाऱ्या उमेदवारांना टक्केवारीत काही सूट देण्यात आली आहे. त्यांना किमान 55% गुण असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रियेत 4 टप्प्यांचा समावेश आहे. या सर्व टप्प्यांमध्ये पात्र उमेदवारांना या भरतीसाठी असलेल्या नियुक्तीस पात्र होता येणार आहे. या निवड प्रक्रियेत लिखित परीक्षा, मुलाखत, दस्तऐवज पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणी या टप्प्यांचा समावेश आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घ्यावा.