आता प्रवास होणार अधिक सोपा! रेल्वेच्या सर्व सेवा एकच ठिकाणी मिळणार, लवकरच लाँच होणार हे ॲप
जर तुम्ही क्रीडा क्षेत्रात आहात. विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन क्रीडा क्षेत्रात नाव करत आहात. तर नक्कीच रूमही या भरतीचा आढावा घेतला पाहिजे. रोजगारचं शोधामध्ये असणाऱ्या खेळाडू वर्गातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्वीय रेल्वेमध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. ही भरती खासकरून क्रीडा क्षेत्रातील उमेदवारांसाठी आहे. जर तुम्ही कोणत्याही खेळात तरबेज असाल आणि खेळला असाल तर या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकतात. या भरतीच्या माध्यमातून पूर्वीय रेल्वेतील लेव्हल १, लेव्हल २, लेव्हल ३, लेव्हल ४ तसेच लेव्हल ५ साठी रिक्त पदांना भरले जाईल. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या rrcrecruit.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. एका ठराविक मुदतीपर्यंतच उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज १४ डिसेंबरपर्यंत करायचे आहे.
एकूण ६० रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती भरतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये धनुर्विद्या, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, क्रिकेट, नेमबाजी, ऍथलेटिक्स, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी इत्यादीमधील रिक्त पदांचा समावेश आहे. वरील क्रीडांमध्ये तरबेज तससह अनुभव असणाऱ्या उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या भरतीच्या प्रक्रियेमध्ये काही अटी शर्ती पुरवण्यात आल्या आहेत. त्या अटी शर्तीना पात्र उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत.
तसेच एका ठराविक वयोमर्यादेतील उमेदवाराना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. लेव्हल ४ तसेच लेव्हल ५ च्या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून पदवीधर हवा. लेव्हल २ तसेच लेव्हल ३ च्या पदासाठी अर्ज कर्ता उमेदवार SSC उत्तीर्ण किंवा HSC उत्तीर्ण हवा. जर तुमचे शिकणं दहावी उत्तीर्ण आहे तर तुम्ही लेव्हल १ पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात. तसेच लेव्हल १ च्या रिक्त पदांसाठी अर्ज कर्त्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
अधिसूचनेत उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात अटी शर्ती देण्यात आल्या आहेत. या भर्तीसाठी अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान वय १८ निश्चित करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त २५ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड काही विशेष प्रक्रियेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. सर्वप्रथम अर्ज कर्त्या उमेदवाराची खेळाची चाचणी घेण्यात येईल. तसेच याला पात्र करत उमेदवारांना दस्तऐवजांच्या तपासणीसाठी यावे लागणार आहे आणि मेरूची सूचीच्या माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल.