फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेड (NSCL)ने भरतीच्या सांधित्व अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी, या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली. या भरतीच्या माध्यमातून NSCL अंतर्गत असलेल्या विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. १८८ रिक्त पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी अशा विभिन्न पदांसाठी काम करू इच्छुक असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. परंतु, अद्याप या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
हे देखील वाचा : CBSE ने जाहीर केली डेट शीट २०२५; ‘या’ तारखेला घेतल्या जातील परीक्षा
२६ ऑक्टोबर २०२४ पासून या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या उमेदवारांची नियुक्ती संगणक आधारित परीक्षेच्या आधारे घेण्यात येईल. २२ डिसेंबर २०२४ रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ५०० रुपये अरुज शुल्क भरावे लागणार आहे. तर EWS आणि OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. या भरती संबंधित विशेष बाब म्हणजे अनुसूचित जाती तससह अनुसूचित जमातीमधून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे. तसेच PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील निशुल्क अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भारत येणार आहे.
NSCL च्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती उमेदवाराचे शिक्षण तसेच त्यांच्या वयोमर्यादेच्या संबंधित आहेत. अधिसूचनेत नमूद वयोमर्यादेच्या संबंधित अटीनुसार, किमान १८ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २७ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
हे देखील वाचा : RBI तर्फे आयोजित स्पर्ध्येत राज्यातील ‘या’ शैक्षणिक संस्थ्येने पटकावला तृतीय क्रमांक
NSCL च्या या भरतीमध्ये उमेदवारांची नियुक्ती करण्यसाठी तीन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया आयोजित केली जाईल. या निवड प्रक्रियेत उमेदवाराची लेखी परीक्षा घेतली जाईल. मग उमेदवारांना दस्तऐवजांची पडताळणी करावी लागणार आहे. तसेच वैद्यकीय चाचणीला उत्तीर्ण करत संपूर्ण नियुक्त प्रक्रिया पात्र ठरलेले उमेदवार या भरतीसाठी नियुक्त होण्यास पात्र आहे.