घरच्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कन्फर्म रेल्वे तिकीट पाहिजे? 'या' टीप्स फॉलो करा (फोटो सौजन्य - pinterest)
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. देशभरात अनेक उमेदवार भारतीय रेल्वे मध्ये काम करण्यास इच्छुक असतात. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड नियमितपणे भारतीय रेल्वेतील वेकन्सी जाहीर करत असतो. भारतीय रेल्वेमध्ये भरती होण्यास इच्छुक असणारे उमेदवार आर आर बी च्या भरतीच्या माध्यमातून अर्ज करत असतात. त्यातील अनेक जण या भरतीस पात्र ठरत नियुक्त होत असतात. भारतीय रेल्वे मध्ये काम करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करत असतात. भारतीय रेल्वेमध्ये रिक्त जागांना भरण्यासाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड नेहमी प्रयत्नशील असतो. दरम्यान येत्या काही भरती प्रक्रियांचे शेड्युल रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने जाहीर केले आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या या भरतीमध्ये अर्ज करण्यास आणि सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जाहीर वेळापत्रकाचा आढावा घ्यावा. त्यानुसार अर्ज करण्याच्या तयारीत लागावे.
हे देखील वाचा : CA च्या परीक्षेची तयारी करताय? जाणून घ्या परीक्षेच्या तयारीसाठी काही टिप्स
दरम्यान, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्याचे योजले आहे, त्या संबंधित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांची नियुक्ती अनेक निवडणुकीच्या टप्प्यातून होणार आहे. त्यात मुख्य परीक्षेत अर्ज करत्या उमेदवारांना उपस्थित रहावे लागणार आहे. तसेच मुख्य परीक्षा पात्र करावी लागणार आहे. त्या परीक्षेत अपात्र ठरणाऱ्या उमेदवार नियुक्तीसाठीही अपात्र ठरतील. जूनियर इंजिनियर, सहाय्यक लोको पायलट, टेक्निशियन तसेच उपनिरीक्षकाच्या पदासाठी जी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे त्याचे शेड्युल जाहीर करण्यात आले आहे.
परीक्षेच्या चार दिवसांमध्ये एक्झाम सिटी स्लिप तसेच प्रवेश पत्र जाहीर केले जाईल. तेव्हा उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र पाहता येणार आहे तसेच डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांकडे प्रवेश पत्र असणे अनिवार्य आहे, अन्यथा उमेदवार परीक्षेत उपस्थित राहण्यास अपात्र ठरेल. महत्वाची गोष्ट अशी की अनुसूचित जमाती तसेच अनुसूचित जाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना एक्झाम सिटी आणि स्थिती बघण्याची विंडो परीक्षेच्या दहा दिवसां आधीच खुले केले जाईल. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने उमेदवारांना सल्ला दिला आहे की,’ या भरती प्रक्रिया विषयी तसेच परीक्षा विषयी जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घ्यावा. अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी. या प्रसंगी अनेक दलाल नोकरी देण्याच्या हेतूने उमेदवारांना फसवतील. तर त्यापासून उमेदवारांनी सावध राहावे.”
हे देखील वाचा : BOB मध्ये भरतीला सुरुवात; विविध विभागांमध्ये व्हॅकंसी, जाणून घ्या या भरतीविषयी
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड टेक्निशियन भरती परीक्षेचे आयोजन 18 ते 20 डिसेंबर दरम्यान केले जाईल. तसेच ती परीक्षा 23 डिसेंबर, 24 डिसेंबर, 26 डिसेंबर, 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबरला आयोजित करण्यात येईल. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जुनियर भरती परीक्षेचे आयोजन डिसेंबरच्या 13, 16 आणि 17 तारखेला करण्यात येईल. तर आरपीएफ सब इन्स्पेक्टर च्या पदासाठी परीक्षा डिसेंबरच्या 2, 3, 9 आणि 12 तारखेला आयोजित करण्यात येईल. महत्वाची बातमी अशी आहे की परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात परीक्षा द्यायची आहे.