फोटो सौजन्य - Social Media
बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्यास इच्छुक आहात तर या संधी विषयी तुम्ही नक्कीच जाणून घेणे फायद्याचे आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये असणाऱ्या अनेक जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. एकूण 600 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. विविध विभागातील रिक्त पदांसाठी उमेदवारांना भरतीच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे तसेच नियुक्तीस पात्र होता येणार आहे. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे. उमेदवारांना 17 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा: RBI मध्ये मेडिकल कन्सल्टंटच्या पदासाठी भरती प्रक्रिया; लवकर करा अर्ज
विविध विभागातील 592 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांमध्ये फायनान्स मॅनेजर, एमएसएमइ रिलेशनशिप मॅनेजर, ए आय हेड डेटा इंजिनियर सारख्या अनेक पदांचा समावेश आहे. रिक्त जागांमध्ये वित्त विभागातील 1 जागा, एमएसएमई बँकिंग क्षेत्रातील 140 रिक्त जागा, डिजिटल समूहातील 139 जागा, सुचान प्रद्योगिक क्षेत्रातील 31 जागा, कॉर्पोरेट विभागातील 79 जागा तर प्राप्य प्रबंधन विभागातील 202 रिक्त जागांचा समावेश आहे.
बँक ऑफ बडोदाच्या या भरतीसाठी अर्ज करण्याची उमेदवारांना काही अटी-शर्ती पात्र करणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. मुळात या अटी शर्ती उमेदवारांच्या वयोगटात संदर्भात आहेत. तसेच शैक्षणिक अटी शर्ती उमेदवारांना पात्र करावे लागणार आहेत. संबंधित विषयांमध्ये उमेदवार पदवीधर असणे अनिवार्य आहे तर उमेदवाराकडे कामांमध्ये कमीत कमी एक वर्षाचा तर जास्तीत जास्त बारा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. एकंदरीत उमेदवार पदवीधर असला पाहिजे आणि अनुभवी असला पाहिजे ही अट बँक ऑफ बडोदा कडून वर्तवण्यात आली आहे.
हे देखील वाचा : स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम कामगिरीसाठी, ‘या’ टिप्सचे ठरतील प्रभावी
बँक ऑफ बडोदाच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे गरजेचे आहे. सामान्य श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 600 रुपयांची भरपाई करायची आहे. तर ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही 600 रुपये भरावे लागणार आहे. अनुसूचित जाती असेच अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांनाही शंभर रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंगच्याद्वारे करण्यात येणार आहे.