
फोटो सौजन्य - Social Media
अर्ज करताना उमेदवारांनी प्रथम ippbonline.com या साइटवर “Apply Online” लिंकवर क्लिक करावे, नंतर नवीन रजिस्ट्रेशन करून लॉगिन करावे. आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी आणि मागवलेली कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करून फॉर्म सबमिट करावा. शेवटी फॉर्मचा प्रिंटआउट काढून ठेवणे महत्त्वाचे आहे. ही भरती विशेषतः सरकारी नोकरी आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी सुवर्णसंधी आहे. अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर उमेदवारांना या माध्यमातून स्थिर आणि उच्च वेतनाची नोकरी मिळू शकते. त्यामुळे इच्छुकांनी उशीर न करता त्वरित अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आपल्या करिअरची दिशा बदलण्याची ही संधी साधावी.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक माहिती
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारतीय टपाल विभागाच्या मालकीची सरकारी बँक असून तिची स्थापना १ सप्टेंबर २०१८ रोजी करण्यात आली. या बँकेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे. ग्रामीण भागात जिथे पारंपरिक बँका पोहोचू शकत नाहीत, तिथेही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार, पैसे ट्रान्सफर, विमा, आणि बचत खाते अशा सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
IPPB चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि सध्या देशभरातील हजारो पोस्ट ऑफिसेसमधून या बँकेच्या सेवा दिल्या जात आहेत. या बँकेची खासियत म्हणजे पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्या माध्यमातून नागरिकांच्या दारापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवणे. त्यामुळे आर्थिक समावेशनाला मोठी चालना मिळाली आहे.