भारताची सर्वात मोठी बॅंक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. एसबीआयच्या CSR शाखेने आशा शिष्यवृत्ती योजनेची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. SBI आशा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. 6 वी ते 12 व उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
SBI आशा शिष्यवृत्ती योजना
SBI आशा शिष्यवृत्ती योजना ही SBI फाउंडेशनच्या शैक्षणिक शाखे अंतर्गत चालवण्यात येते. आशा शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश हा भारतातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना अर्थ सहाय्य प्रदान करण्याचा आहे. यामुळे या गुणवंत मुलांचे शिक्षण चालू राहू शकते तसेच ते कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय सहजपणे उच्च शिक्षण घेऊ शकतो. आशा शिष्यवृत्तीचा लाभ 6 वी ते पदव्युत्तर विद्यार्थी घेऊ शकतात. अगदी IIT आणि IIM मध्ये शिकत असणारे विद्यार्थीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
SBI आशा शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता
SBI आशा शिष्यवृत्ती योजनेची विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम
SBI आशा शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आशा शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज प्रक्रिया