Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI Recruitment 2026: SBIची बंपर भरती जाहीर! ‘या’ पदासाठी पगार तब्बल १ कोटी, अर्ज कसा करायचा?

SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या वेल्थ मॅनेजमेंट विभागात Specialist Cadre Officer पदांसाठी एकूण 207 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. Zonal Head, Regional Head, Relationship Manager - Team Lead, Investment Specialist, Investment Officer, VP Wealth आणि AVP Wealth अशा 7 प्रकारच्या पदांचा यात समावेश आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 27, 2026 | 12:16 PM
SBI Recruitment 2026: SBIची बंपर भरती जाहीर! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

SBI Recruitment 2026: SBIची बंपर भरती जाहीर! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • SBIमध्ये Specialist Cadre Officerची 207 पदे भरली जाणार.
  • अर्जाची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2026; लेखी परीक्षा नाही.
  • Zonal Head पदासाठी CTC तब्बल ₹97 लाखांपर्यंत.
 

SBI Jobs 2026: बँकेत नोकरी करायची स्वप्नं बघताय का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील सगळ्यात मोठी बँक SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी भरती काढली. ही भरती क्लार्क किंवा PO सारखी नाहीतर एकदम हाय-लेव्हल प्रोफाईलसाठी आहे. वेल्थ मॅनेजमेंट विभागात Specialist Cadre Officer ची पदं भरली जाणार आहेत. एकूण 207 जागा असून वरच्या पदांना तर लाखोंचं पॅकेज आहे. SBI Recruitment 2026:

अर्जाची तारीख वाढली, आता 5 ऑक्टोबर शेवटची

SBI ने ही भरती 4 सप्टेंबर 2025 ला जाहीर केली. आधी अर्ज करायची शेवटची तारीख 25 सप्टेंबर होती, पण बऱ्याच लोकांना अर्ज करता आला नाही म्हणून बँकेने मुदत वाढवली आहे. आता तुम्ही 5 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज SBI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करायचा आहे. ही भरती देशभरातील 17 सर्कलमध्ये होणार आहे.

कोणती पदं आहेत?

या भरतीत एक-दोन नाही तर 7 प्रकारची पदं आहेत.

  • Zonal Head (Retail) – 1 जागा
  • Regional Head – 5 जागा
  • Relationship Manager – Team Lead – 24 जागा
  • Investment Specialist – 9 जागा
  • Investment Officer – 4 जागा
  • VP Wealth – 91 जागा
  • AVP Wealth – 73 जागा
अशा एकूण 207 जागा भरल्या, शिक्षण आणि अनुभव काय लागेल?प्रत्येक पदासाठी वेगळं शिक्षण आणि अनुभव लागेल. नुसती डिग्री असून चालणार नाही, तर कामाचा अनुभव पण हवा. उदाहरणार्थ Zonal Head (Retail) या पदासाठी तुमच्याकडे पदवी तर हवीच, पण सोबत वेल्थ मॅनेजमेंट किंवा रिटेल बँकिंगमध्ये कमीत कमी 15 वर्षांचा अनुभव हवा. आणि टीम सांभाळल्याचा अनुभव पण लागेल. खालच्या पदांसाठी 2-3 वर्षांचा अनुभव पण चालेल, पण फायनान्स, बँकिंग, इन्व्हेस्टमेंट या फिल्डमधला अनुभव असेल तरच तुम्हाला घेतलं जाईल.

Central Govt Employeesच्या DA Hike मध्ये होणार मोठी वाढ? जुलै 2026 च्या सुधारित दरांवर तात्काळ निर्णयाची मागणी

वय किती असावं?

वयाची अट पण पदांनुसार वेगळी आहे. AVP Wealth या पदासाठी वय 23 ते 35 वर्षांच्या मध्ये असावं लागेल. आणि Zonal Head आणि Regional Head सारख्या मोठ्या पदांसाठी वय 35 ते 50 वर्षांपर्यंत चालेल. SC, ST, OBC वाल्यांना सरकारी नियमानुसार वयात सूट मिळेल.

पगार ऐकून थक्क व्हाल,

  • सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पगार किती? तर इथे पगार लाखात आहे.Zonal Head पदासाठी वर्षाचं CTC 97 लाख रुपयांपर्यंत आहे. म्हणजे महिन्याला 8 लाखांपेक्षा जास्त
  • Regional Head साठी 66.40 लाखांपर्यंत पॅकेज आहे. Relationship Manager – Team Lead साठी 51.80 लाखांपर्यंत पगार जाईल.
  • बाकीच्या VP आणि AVP पदांसाठी पण चांगला पगार आहे, पण तो इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या अनुभवावर ठरेल.

परीक्षा नाही, फक्त इंटरव्ह्यू

ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. SBI PO किंवा Clerk सारखी लेखी परीक्षा इथे नाही. तुमचा अर्ज बघून तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल. तुमचं शिक्षण, अनुभव बघितला जाईल आणि मग थेट इंटरव्ह्यूला बोलावलं जाईल. इंटरव्ह्यू 100 मार्कांचा असेल आणि त्यानंतर तुमच्या पगाराबद्दल बोलणी होईल.

SBI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा मेगाप्लॅन! 12 हजार …

अर्ज कसा करायचा?

सगळ्यात आधी SBI च्या करिअर पेजवर जा, sbi.co.in वर. तिथे Specialist Cadre Officer Recruitment ची जाहिरात दिसेल, ती पूर्ण वाचा.मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा, तुमचा फोटो, सही आणि सगळी कागदपत्रं अपलोड करा. अर्ज फी भरावी लागेल. आणि 5 ऑक्टोबरच्या आत फॉर्म भरा, नंतर मुदतवाढ मिळेलच असं नाही.ज्यांना बँकिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी ही एकदम सुवर्ण संधी आहे.

Web Title: Sbi recruitment 2026 207 specialist cadre officer posts salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • SBI Bank
  • Sbi Job
  • SBI Recruitment 2026

संबंधित बातम्या

SBI SCO Recruitment 2026: बापरे! SBI च्या २०७ जागांसाठी तब्बल ९७ लाखांपर्यंत पॅकेज; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
1

SBI SCO Recruitment 2026: बापरे! SBI च्या २०७ जागांसाठी तब्बल ९७ लाखांपर्यंत पॅकेज; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

SBI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा मेगाप्लॅन! 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती, 250 नव्या शाखा उभारणार
2

SBI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा मेगाप्लॅन! 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती, 250 नव्या शाखा उभारणार

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम
3

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.