शहा महिला महाविद्यालयात ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’; विद्यार्थिनींना शिक्षणासोबत करिअरची नवी संधी
राज्यात प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील; ५,०१२ पदांसाठी महिनाभरात जाहिरात अपेक्षित
महाविद्यालयाच्या सर्वच विभागाच्या पुढाकारातून आणि विविध संस्थांच्या सहकार्याने ऑन द जॉब ट्रेनिग उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत विद्यार्थिनीनी विविध शाळा, कार्यालये प्रसार माध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि उद्योगक्षेत्रात जाऊन १०० तासांचे प्रशिक्षण पूर्ण केले.
या प्रशिक्षणादरम्यान विद्याथ्यांना केवळ कामाची ओळखच नाही. तर जबाबदारी, वेळेचे व्यवस्थापन, संवादकौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता यांसारखी जीवनावश्यक कौशल्येही आत्मसात करण्याची संधी मिळाली.
ओजेटी हा उपक्रम विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे विद्यार्थिनीना केवळ नोकरी मिळविण्यास मदत होत नाही, तर त्यांना एक जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणाही मिळते, भविष्यातही अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप
देण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी दिली.
या प्रशिक्षणाचा सर्वांत सकारात्मक परिणाम म्हणजे अनेक विद्यार्थिनीना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच संस्थांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. मराठी विभागातील आठ विद्यार्थिनींनी रिटेल सेल्स असोसिएट ट्रेनिंग प्रोग्राम या प्रकल्पात ग्राहकांशी व्यावसायिक संवाद, विक्री कौशल्याचे प्रशिक्षण अंतर्गत पूर्ण करताच, त्यांना सेन्को गोल्ड अँड डायमं, कॅरेटलेन, तनिष्क, त्रिभुवनदास भिमजी झवेरी, तनिष्क सारख्या नावाजलेल्या दागिन्यांच्या दुकानात नोकरीची संधी मिळाली आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनीने आपल्या अनुभवांविषयी बोलताना सांगितले की, ‘पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष काम करताना मिळणारा अनुभव खूप वेगळा असतो. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण हळूहळू आत्मविश्वास वाढला. शिक्षक आणि संस्थेतील मार्गदर्शकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही काम व्यवस्थित शिकू शकलो.’






