फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने भरती प्रक्रियेविषीयी महत्वाची घोषणा केली आहे., रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड देशातील रोजगार निर्मितीच्या संस्थेमधील एक आहे. ही अग्रेसर कंपनी नेहमी देशात रोजगार निर्मिती करत आहे. भरटीओचे रेल्वे संबंधित असणाऱ्या या कंपनीने दरवर्षी हजारो उमेदवारांची रेल्वेत भरती करते. एकंदरीत, भारतात रेल्वे प्रशासनामध्ये कामगारांची नियुक्ती करण्यामध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड महत्वाची भूमिका बजावते. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड वेळोवेळी विविध रेलवे विभागातील वॅकन्सी आणण्यासाठी प्रयत्नशील असते. भारतीय रेल्वेमध्ये काम करू पाहणारे अनेक उमेदवार रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डावर नेह्मी लक्ष ठेवून असतात. वेळोवेळी निघणाऱ्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या या भरती प्रक्रियेमध्ये किंचित बदल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : NLC या सरकारी कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करण्याची संधी, तब्बल 505 रिक्त जागा
नुकतेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने एक महत्वचाच निर्णय जाहीर केले आहे. महत्वाची बाब म्हणजे हे निर्णय भरती होऊ इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसंदर्भात आहे. रेल्वे भरतीमध्ये आधार कार्ड व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ कि प्रत्येक उमेदवाराला भरती प्रक्रियेमध्ये त्याचे आधार कार्डाची तपासणी करावी लागणार आहे. आधार कार्डाशिवाय अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला अर्ज प्रक्रियेदरम्यान आधार कार्ड व्हेरिफिकेशन करणे भाग आहे. या अगोदर असलेल्या अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवाराला आधार कार्ड शिवाय इतर दस्तवेज सादर करण्याची मुभा होती. यामध्ये ड्राइविंग लाइन्सस, पासपोर्ट, पॅन कार्ड तसेच वोटर कार्ड, इत्यादींचा समावेश होतो. परंतु, आता असे करता येणार नाही आहे. उमेदवाराला आधार कार्ड सादर करावेच लागणार आहे.
हे देखील वाचा : स्टडी ग्रुपने उत्तर अमेरिकन शिक्षण संधींसह भारतीय विद्यार्थ्यांना केले सक्षम
बोर्डाने या निर्णयाविषयी अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेमध्ये नमूद केले आहे कि,” उमेदवाराला आपली ओळख दाखवण्यासाठी आधार कार्ड सादर करणे अनिवार्य आहे. आधार कार्ड सादर करून अर्ज केल्यास अर्जधारकांसाठी परीक्षा तसेच त्यानंतरचे कार्य अधिक सोपे आणि सरळ होऊन जाईल.” मुळात काही उमेदवार असे आहेत ज्यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु या अर्ज प्रक्रियेदरम्यान त्यांनी आधार कार्ड सादर केले नाही आहे. अशा उमेदवारांना पुन्हा rrbapply.gov.in वर लॉग इन करून आधार कार्ड सादर करावा लागणार आहे. महत्वाचे म्हणजे हा नियम त्याच उमेदवारांना लागू आहे ज्यांनी वर्ष २०२४ मध्ये आधार कार्ड व्यतिरिक्त इतर आयडी प्रूफने अर्ज केले आहे.