Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर विद्यापीठात ‘हेडाम’ कादंबरीचे विशेष शिक्षण! BA मराठी अभ्यासक्रमात भर

नागु विरकर यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी ‘हेडाम’ सोलापूर विद्यापीठाच्या बी.ए. मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट झाली असून, या कृतिशील यशाबद्दल त्यांना ‘जिल्ह्याचे भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 08, 2025 | 07:25 PM
फोटो सौजन्य : Social Media

फोटो सौजन्य : Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: नागु विरकर यांच्या ‘हेडाम’ कादंबरीचा सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश होणं ही पालघर जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे. मोखाडा तालुक्यातील किनीस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख नागु विरकर यांनी लिहिलेली ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बी.ए. दुसऱ्या वर्षाच्या मराठी साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना ‘जिल्ह्याचे भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

UPSC NDA, NA, CDS 2025: परीक्षेसाठी अर्ज करण्यात आलेल्या फॉर्ममध्ये सुधारणा करण्यासाठी दुरुस्ती विंडो उघड, असा भरा फॉर्म

‘हेडाम’ ही केवळ कादंबरी नाही, तर ती एक मेंढपाळाच्या जीवनाचा आरसा आहे. या कादंबरीत लेखकाने मेंढपाळांचे दैनंदिन जगणे, त्यांच्या अडचणी, समाजातील वंचितता, शिक्षणापासून दुरावलेली पिढी आणि त्यांच्या मनातील वेदना व आकांक्षा याचं चित्रण अत्यंत वास्तववादी पद्धतीने केलं आहे. या साहित्यकृतीत ग्रामीण जीवनाचा, पशुपालनाचा, देवभोळेपणाचा आणि अंधश्रद्धेचा वेध घेत समाजप्रबोधनात्मक संदेश दिला आहे.

नागु विरकर यांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. मूळ सातारा जिल्ह्यातील म्हसवड (मसाईवाडी) गावचे रहिवासी असलेले विरकर हे मेंढपाळाच्या कुटुंबातून आले. त्यांचे शिक्षण केवळ गुरुजींच्या प्रेरणेने सुरू झालं आणि त्यांनी अनेक अडचणींवर मात करत डी.एड पूर्ण केले. नोकरी नसतानाही त्यांनी मेंढपाळाच्या तांड्याबरोबर फिरत शिक्षण सुरू ठेवले. याच वास्तव जगण्यावर त्यांनी ‘हेडाम’ लिहिली, जी आज मराठी साहित्यात महत्त्वाचं स्थान प्राप्त करत आहे.

सोलापूर विद्यापीठाच्या भाषा विभागाने अभ्यासक्रम निवडताना या कादंबरीची सखोल चाचपणी करून तिला मराठी कथनात्मक साहित्य आणि आस्वाद या घटकांअंतर्गत स्थान दिलं आहे. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ आणि ‘माणदेशी माणसं’ या अजरामर कादंबऱ्यांच्या पंक्तीत ‘हेडाम’ही उभी ठाकली आहे.

Maharashtra Mega Bharti : तरुणांनो तयारीला लागा! राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

पालघर जिल्हा परिषदेच्या बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या सत्कार समारंभात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण अधिकारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. नागु विरकर यांचं हे यश ग्रामीण साहित्यप्रेमींना प्रेरणा देणारं आहे. ‘हेडाम’ ही केवळ आत्मकथा नसून ती वंचित समाजाचा आवाज बनली आहे.

Web Title: Special education on the novel haydam at solapur university added to ba marathi curriculum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 07:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.