(फोटो- सोशल मिडिया)
पीसीएम-पीसीबीसीईटीच्या नोंदणीस विशेष मुदतवाढ
१५ आणि १६ एप्रिल २०२६ रोजी नोंदणी होणार
सीईटी कक्षाने लक्षात घेतली विद्यार्थ्यांची विनंती
सोनाजी गाढवे/पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या (CET Exam) जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीअभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीएम समूहाच्यापहिल्या संधीची सीईटी परीक्षासुरु आहेत. तसेचपीसीबी समूहाची (Career) पहिल्या संधीची सीईटी दि.२१ एप्रिल २०२६ पासून सुरु होत आहे.
विद्यार्थ्याच्या विनंती लक्षात घेऊन सीईटी कक्षाने पीसीएम आणि पीसीबी समूहासाठीदुसऱ्या संधीसाठी विशेष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसारदुसऱ्या संधीसाठीच्यासीईटीसाठी नोंदणीची तारीख विलंब शुल्कासह दिनांक १५ व १६ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली आहे.दुसऱ्या संधीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनी तत्काळ नोंदणी करण्याचे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
दुसऱ्या संधीसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना
-या कालावधीत, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली नाही, ते दुसऱ्या संधीसाठीनोंदणी करू शकतात.
-ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही संधीसाठी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
-ज्या विद्यार्थ्यांनीअद्याप आपला अपारआयडी तयार केलेला नाही, त्यांनी तो डिजीलॉकरद्वारे तयार करावा, पणहे बंधनकारक नाही.
-या वाढीव कालावधीत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही दुरुस्तीची सुविधा उपलब्ध नसेल. अर्जसबमिट करण्यापूर्वी नोंदणीकेलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी.
MHT PCM CET परीक्षेला सुरूवात; महाराष्ट्रात तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची उपस्थिती
दुसऱ्यासंधी साठी ४ लाख १ हजार ३५० विद्यार्थ्याची नोंदणी
यावर्षीपासून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील एमएचटी पीसीएम व पीसीबी समूहाच्या विद्यार्थ्यांना प्रथमच प्रवेश परीक्षेच्या दोन संधी दिल्या जात आहेत. आजपर्यंत या सीईटीसाठी दुसऱ्या संधीची नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख ०१ हजार ३५० आहे. एमएचटी पीसीएम सीईटीच्या दुसऱ्या संधीला २ लाख ९६ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर एमएचटी पीसीबीसीईटीच्या दुसऱ्या संधीला १ लाख ०४ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीआहे.
PCM CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना जाहीर; ‘या’ तारखेला सुरू होणार परीक्षा
नोंदणी अर्ज…
या सीईटी परीक्षेसाठी दुसऱ्या संधीसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सीईटी – दुसऱ्यासंधीसाठी नोंदणी
एमएचटी पीसीएमसमूह – २,९६,५५३
एमएचटी पीसीबी समूह – १,०४,७९७
एकूण – ४,०१,३५०






