Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरोघरी जाऊन भाज्या विकणारा मुलगा RAS पदी विराजमान; नातलग पडले आश्चर्यात!

घराघरात भाजी विकणारा पवन कुमार प्रजापत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर RAS अधिकारी झाला. गरिबी आणि संघर्षातून यश मिळवून त्यांनी अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 09, 2025 | 08:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील पवन कुमार प्रजापत यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. बालपणापासून आर्थिक अडचणींनी ग्रस्त असलेला पवन आज RAS (राजस्थान अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस) अधिकारी झाला आहे. घराघरांतून भाजी विकणारा हा मुलगा आज लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.

भारतीय तटरक्षक दल सहाय्यक कमांडंट भरती 2025: 2027 बॅचसाठी मोठी संधी, लवकर करा अर्ज

पवन कुमार यांचे शालेय शिक्षण गावातील सरकारी शाळेत 5वीपर्यंत पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन वयाच्या लहान वयातच काम करण्यास सुरुवात केली. दहावीपर्यंत शिक्षण घेताना ते गावात घराघरात जाऊन भाजी विकायचे. याच पैशांवर त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जगणं चालायचं. शिक्षण आणि उदरनिर्वाह यांचा संघर्ष पवन यांनी जवळून अनुभवलाय.

दहावीनंतर जोधपूरमध्ये ते दररोज फक्त ₹50 रोजंदारीवर मजुरी करत होते. त्याच वेळी त्यांनी प्रायव्हेट BA चे शिक्षणही सुरू ठेवले. 2012 साली भारतीय सैन्यात चपराशाची नोकरी मिळाली होती, पण त्यांनी ती न स्वीकारता शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर भर दिला. 2013 मध्ये रेल्वेमध्ये गनमॅन आणि 2014 मध्ये पटवारी म्हणून निवड झाली, मात्र त्यांचे स्वप्न काही वेगळंच होतं, RAS अधिकारी होण्याचं.

2016 मध्ये LRO (Legal Research Officer) पदासाठी त्यांची निवड झाली, परंतु त्यांनी आपली RAS अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा सोडली नाही. 2018 मध्ये त्यांनी पहिल्यांदा RAS परीक्षेला बसण्याचा प्रयत्न केला, मात्र यश मिळालं नाही. पण त्यांनी हार मानली नाही. पुन्हा अभ्यास सुरू ठेवत 2021 मध्ये घेतलेल्या RAS परीक्षेत त्यांना 170वी रँक मिळाली आणि अखेर त्यांचं स्वप्न साकार झालं.

RCFL मध्ये 74 पदांसाठी भरती सुरू; ‘या’ पदांसाठी करता येईल अर्ज

पवन कुमार प्रजापत यांचा प्रवास हा फक्त स्पर्धा परीक्षा पास होण्याचा नाही, तर अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही जिद्दीने लढण्याचा आहे. त्यांनी सिद्ध केलं की गरिबी, अडचणी आणि अपयश ह्यांना मात दिल्यास यश नक्कीच मिळू शकतं. आज ते केवळ एक अधिकारी नाही, तर लाखो गरजू, मेहनती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरले आहेत.

Web Title: Success story of pawan kumar prajapat ras marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • IAS exam
  • IPS

संबंधित बातम्या

दिसायला जणू अभिनेत्री! सोशल मीडियाची स्टार… IPS अधिकारी अंशिकाची यशोगाथा
1

दिसायला जणू अभिनेत्री! सोशल मीडियाची स्टार… IPS अधिकारी अंशिकाची यशोगाथा

देशातील सगळ्यात शिक्षित व्यक्तिमत्व! २० पदव्या, ४२ विद्यापीठे… IAS अधिकारी ते कुशल राजकारणी
2

देशातील सगळ्यात शिक्षित व्यक्तिमत्व! २० पदव्या, ४२ विद्यापीठे… IAS अधिकारी ते कुशल राजकारणी

दृष्टी नसली तरी इच्छाशक्ती होती! मनूने जे केलं ते पाहून अनेकांना मिळाली प्रेरणा
3

दृष्टी नसली तरी इच्छाशक्ती होती! मनूने जे केलं ते पाहून अनेकांना मिळाली प्रेरणा

IAS यशोगाथा: वडिलांचा आधार गेला… कोचिंगसाठी पैसे नाही; दोनदा UPSC केली उत्तीर्ण
4

IAS यशोगाथा: वडिलांचा आधार गेला… कोचिंगसाठी पैसे नाही; दोनदा UPSC केली उत्तीर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.