फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड – मोखाडा: मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम आणि छोटे खाणी अशा आडोशी गावात विलास कचरू गांगुर्डे हे बौद्ध कुटुंब वास्तव्य करून राहत आहे. परंतु प्रसार माध्यमं किंवा कोणतीही माहीती मिळण्याचा अभाव असताना देखील गांगुर्डे यांचा मुलगा संदेश याने अथक परिश्रम घेऊन भारतीय सैन्य दलाथ महार बटालियन मध्ये आपली वर्णी लावून घेतली आहे. त्याची ही देशभक्ती पाहून बौद्ध समाज बांधवां सोबतच संपूर्ण गावाने संदेशला शुभेच्छा देत अक्षरशः महोत्सव साजरा केला आहे.
संदेश गांगुर्डे याने मध्यप्रदेश मधील सागर महार रेजिमेंट सेंटर येथे 22 मार्च ते 3 डिसेंबर दरम्यानच्या नऊ महिन्यात कठोर परिश्रम घेऊन प्रशिक्षण घेतले आहे. सिक्कीम येथे 18 मार्च रोजी जनरल ड्युटी पोस्टवर देश सेवेसाठी आता तो रुजू होणार आहे. बाहेरचे जग पाहिले नसतानाही एका अशिक्षित कुटुंबाने आपल्या मुलाला देश सेवेसाठी पाठविण्याचे धाडस करणे हे इतरांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. माय मरो मावशी उरो, या उक्तीला तंतोतंत साजेशी किमया संदेशच्या बाबतीत घडली आहें. आई वडील अशिक्षित असले तरी संदेशच्या जीवनाला आकार देणारी खरी किमयागार त्याची मावशी शिला शिंदे राहणार वाळवीहीर (इगतपुरी) हि संदेशसाठी खरी शिल्पकार ठरली आहे. प्राथमिक शिक्षणापासून आकार देत थेट सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण घेण्याचे प्रोत्साहन देत थेट त्याची परिनती सैन्य भरतीत करण्याचे श्रेय शिला शिंदे यांना जाते.
ऊन, वारा पाऊस, हिम वर्षा किंवा कोणत्याही आपत्ती जन्य वातावरणात सीमेवर खंबीरपने देशाचे संरक्षण करण्याचे भाग्य लाभने हि कौतुकास्पद बाब आहे. आणि अशिक्षित कुटुंबातून स्वतःच्या प्रयत्नातून हि संधी मिळविणे या सारखे दुसरे भाग्य नाही असे गौरवोद्गार मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती यांनी काढले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरंचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवली की यश हाकेच्या अंतरावर असते मात्र त्याच्यावर धोरणात्मक अंमलबजावणी करण्याची गरज असते हि बाब लक्षात घेऊन संदेशने स्वतःच्या मेहनतीवर भारतीय सैन्य दलाला गवसनी घेतली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन मोखाडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे यांनी केले आहे.
देशशेवेचा वसा घेऊन देशाचं रक्षण करण्याचा जन्मजात वसा लाभने हि भाग्याची गोष्ट असल्याचे मत ग्रामपंसंचायत विस्तार अधिकारी महेंद्र उबाळे यांनी व्यक्त केले आहे. प्रस्तुत कार्यक्रमासाठी भाऊराव गांगुर्डे , ईश्वर गांगुर्डे , प्रकाश दोंदे ,बाळू घाटाळ , चंद्रकांत गांगुर्डे, रघुनाथ गांगुर्डे, बाळू गांगुर्डे, प्रकाश गांगुर्डे,अनंता पाटील,रमेश पाटील, मंगेश दाते सर्व पंचक्रोशीतील नातेवाईक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.