मुंबईमध्ये नोकरीची मोठी संधी, टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 'या' पदासाठी निघालीये भरती; वाचा... जाहिरात
मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल तर मुंबईच्या परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजी विभागात भरती निघाली आहे. हे हॉस्पिटल भारतातील प्रमुख कर्करोग उपचार आणि संशोधन केंद्र आहे. जे कर्करोगाच्या उपचार, संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्राशी संबंधित आहे. त्यामुळे आता मुंबईत नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.
26 ऑगस्ट रोजी थेट मुलाखत होणार
टाटा मेमोरियल सेंटरमधील या भरतीच्या माध्यमातून पॅथॉलॉजी विभागातील ‘तदर्थ वरिष्ठ रहिवासी’ पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. असे आवाहन टाटा मेमोरियल सेंटरकडून करण्यात आले आहे. या मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव – टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई
भरले जाणारे पद – पॅथॉलॉजी विभागातील तदर्थ वरिष्ठ रहिवासी
एकुण रिक्त पद संख्या – 06 पदे
कशी होणार निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
कुठे होणार मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – होमी भाभा ब्लॉक, 13 वा मजला, शैक्षणिक कार्यालय, टाटा मेमोरियल हॉस्पिटल,परळ, मुंबई
मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – १. ओपनसाठी 40 वर्षे
2. SC/ST साठी : 05 वर्षे सूट असेल.
3. OBC साठी : 03 वर्षे सूट असेल.
4. अपंगांसाठी : १० वर्षे सूट असेल.
हेही वाचा – मुंबई महापालिकेत जम्बो भरती, लिपिक पदाच्या 1846 जागा भरल्या जाणार; आत्ताच करा अर्ज…
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
पॅथॉलॉजी विभागातील तदर्थ वरिष्ठ रहिवासी – MD (Pathology)
किती मिळणार पगार
पॅथॉलॉजी विभागातील तदर्थ वरिष्ठ रहिवासी – 1,21,200 रुपये प्रति महिना
कशी होणार निवड
टाटा मेमोरियल सेंटरमधील पॅथॉलॉजी विभागातील ‘तदर्थ वरिष्ठ रहिवासी’ पदाच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांनी 26 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे. असे आवाहन टाटा मेमोरियल सेंटरकडून करण्यात आले आहे. या भरतीसाठी मुलाखत 26 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात – https://tmc.gov.in/event/upload/19082024_8/pathology%202024.pdf
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://tmc.gov.in/ ला भेट द्या.