Typing Exam Update: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! परीक्षा सुरू होण्यापूर्वी 'हा' तपशील तपासून घेण्याचे आवाहन

Typing Exam 2027: जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी-हिंदी गतीच्या परीक्षांच्या तारखा, ५ सत्रे आणि ४ जानेवारीच्या मॉक टेस्टची माहिती जाणून घ्या
career
फोटो सौजन्य - एआयcareer
Published on: 
Updated on: 
  • संगणक टंकलेखन परीक्षेच्या तारखा निश्चित

  • ४ जानेवारीला होणार मॉक टेस्ट

  • ६ ते २१ जानेवारीदरम्यान ऑनलाइन परीक्षा होणार

Typing Exam 2027: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी-टीबीसी) जानेवारी - २०२७ या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने दि. ६ जानेवारी २०२७ ते २१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पाच सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार

वेळापत्रकानुसार, इंग्रजी ३०, ४० व ५० शब्द प्रति मिनिट या गतीच्या परीक्षा दि. ६ ते १२ जानेवारीदरम्यान, तर मराठी-हिंदी ३०, ४० व इंग्रजी ६० शब्द प्रति मिनिट या गतीच्या परीक्षा दि. १६ ते २१ जानेवारीदरम्यान होणार आहेत. दररोज पाच सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी दि. ४ जानेवारी २०२७ रोजी मॉक टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपला बॅच कोड, विषय कोड आणि परीक्षा वेळ वेळापत्रकातून तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

परीक्षेचे वेळापत्रक 'या' अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध

या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक परिषदेच्या http://www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सर्व संस्थाचालकांनी या परीक्षेच्या तारखांबाबत नोंद घेऊन विद्यार्थ्यांना अवगत करावे, अशा सूचना परिषदेने दिल्या आहेत.

Q

मॉक टेस्ट कधी आयोजित करण्यात आली आहे?

A

विद्यार्थ्यांसाठी ४ जानेवारी २०२७ रोजी मॉक टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे.

Q

परीक्षेचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांसाठी कोणती सूचना देण्यात आली आहे?

A

दररोज पाच सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांनी आपला बॅच कोड, विषय कोड आणि परीक्षेची वेळ वेळापत्रकातून तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Q

इंग्रजी आणि मराठी-हिंदी व इंग्रजी टायपिंग परीक्षा कधी होणार आहेत?

A

वेळापत्रकानुसार इंग्रजी ३०, ४० व ५० शब्द प्रति मिनिट गतीच्या परीक्षा ६ ते १२ जानेवारी दरम्यान, तर मराठी-हिंदी ३०, ४० व इंग्रजी ६० शब्द प्रति मिनिट गतीच्या परीक्षा १६ ते २१ जानेवारी दरम्यान घेतल्या जातील.