फोटो सौजन्य- सोशल मीडिया
पहिला आठवडा — रिव्हिजन आणि बेसिक्सवर पकड
या आठवड्याचा मुख्य उद्देश तुमचे संकल्पना (कॉन्सेप्ट्स) स्पष्ट करणे हा असावा. संपूर्ण अभ्यासक्रमाचे वेगाने रिव्हिजन करा, महत्त्वाच्या मुद्द्यांच्या शॉर्ट नोट्स बनवा, पेपर-१ आणि पेपर-२ च्या मागील ५ वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवा आणि तुमच्या कच्च्या विषयांवर विशेष लक्ष द्या.
दुसरा आठवडा — टॉपिक-वाइज प्रॅक्टिस
या टप्प्यात तुमच्या उणिवा सुधारण्यावर भर द्या. प्रत्येक टॉपिकचे बहुपर्यायी प्रश्न आणि मागील वर्षांचे प्रश्न सोडवा. तसेच, गणित आणि इतर विषयांचे आवश्यक फॉर्म्युले व मुख्य कॉन्सेप्ट्स उजाळत रिव्हिजनसाठी लहान नोट्स तयार करा.
Jobs in Tesla Company: टेस्लामध्ये नोकरी मिळवायची आहे? जाणून घ्या कोणती स्किल्स आहेत आवश्यक!
तिसरा आठवडा — मॉक टेस्ट आणि विश्लेषण
आत्मविश्वास वाढवण्यासाठी या आठवड्यात २ ते ३ फुल-लेंथ मॉक टेस्ट द्या. टेस्ट दिल्यानंतर आपल्या कामगिरीचे सखोल विश्लेषण करा की चुका कुठे होत आहेत. आपल्या कमकुवत बाजू त्यावर काम करा आणि महत्त्वाचे विषय पुन्हा वाचा.
चौथा आठवडा — फायनल टच
परीक्षेसाठी पूर्णपणे तयार होण्यासाठी शेवटच्या दिवसांत सर्व विषयांचे रॅपिड रिव्हिजन करा. मागील वर्षांच्या पेपर आणि PYQs वर सर्वाधिक भर द्या तसेच तुम्ही बनवलेल्या शॉर्ट नोट्स आणि कीवर्ड्स वारंवार आलटून-पालटून वाचा.
एका GPU च्या शोधाने रचला इतिहास! जगातील सर्वात मोठया टेक कंपनीचे CEO Jensen Huang नेमकं किती शिकलेत?
चांगले गुण मिळवण्यासाठी प्रत्येक विषयावर समान ध्यान देणे गरजेचे आहे.
Ans: सीटीईटी डिसेंबर २०२६ परीक्षा १२ आणि २०२६ डिसेंबर रोजी ऑफलाइन (OMR शीट) पद्धतीने आयोजित केली जाईल.
Ans: नाही, सीटीईटी परीक्षेत कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यामुळे विद्यार्थी सर्व १५० प्रश्न आत्मविश्वासाने सोडवू शकतात.
Ans: शेवटच्या ३० दिवसांत ४ आठवड्यांच्या प्लॅननुसार पहिल्या दोन आठवड्यांत बेसिक्स व टॉपिक-वाइज प्रॅक्टिस, तिसऱ्या आठवड्यात मॉक टेस्ट्स आणि चौथ्या आठवड्यात रॅपिड रिव्हिजन व जुन्या प्रश्नपत्रिकांवर भर द्यावा.






