युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पदासाठी उमेदवार नियुक्त केले जाणार आहेत. एकूण २०० रिक्त जागांचा विचार या भरतीच्या प्रक्रियेमध्ये केला जाणार आहे. यामध्ये जनरिलिस्ट तसेच स्पेशालिस्ट पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या १५ तारखेपासून या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत अधिसूचना १४ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली होती. या भरतीमध्ये सहभाग घेऊ इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी या अधिकृत अधिसूचनेचा आढावा नक्की घ्यावा.
हे देखील वाचा : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे विजेत्या शाळा जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाळांना देण्यात आले पुरस्कार
UIIC ने आयोजित केलेल्या या भरतीच्या प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच PWD आणि PSGI या आरक्षित प्रवर्गायुन येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना २५० रुपयांची अर्ज शुल्क म्हणून भरपाई करावी लागणार आहे. तर इतर आरक्षित प्रवर्गातून आणि सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना १००० रुपयांची भरपाई करावी लागणार आहे. उमेदवारांनी ही बाब लक्षात घ्यावी कि ऊमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज शुल्क भरता येणार आहे. तसेच अर्ज करण्याची पद्धतदेखील ऑनलाईन आहे. अर्ज करण्याची पढत जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
UIIC ने आयोजित केलेल्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती शैक्षणिक तसेच वयोमर्यादेसंदर्भात आहेत. अधिसूचनमध्ये नमूद वयोमर्यादेनुसार, किमान २१ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यात पात्र आहेत. या भरतीमध्ये AO (Generalist) पदासाठी १०० जागा रिक्त आहेत. तर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून किमान ६०% गुणांनी पदवीधर असावा. AO (Specialist) पदासाठी एकूण १०० रिक्त असून, या पदासाठी अर्जकर्ता उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून B.Tech/ M.Tech/ CA/ B.Com/ M.Com/ MCA/ LLB मध्ये पदवीधर असावा.
हे देखील वाचा : महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव- कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा
UIIC द्वारे आयोजित या भरतीच्या निवड प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश आहे.