युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) ने विभागातील 1500 स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer) जागांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु असून 13 नोव्हेंबर ही या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in वर जाऊन तात्काळ ऑनलाइन अर्ज करावा. या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज स्वीकारण्यास 24 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे.
या भरतीप्रक्रियेसाठी बँकेने संस्थेतील एकूण 1,500 जागा भरण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) भरती 2024 पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता: या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे भारत सरकार किंवा तिच्या नियामक संस्थांद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील कोणत्याही विषयातील पूर्ण वेळ/नियमित पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: स्थानिक बॅंक अधिकारी पदांसाठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा 20 वर्षे आहे, तर कमाल वयोमर्यादा 30 वर्षापर्यंत असावी.
युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) भरती 2024 अर्ज शुल्क
सामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS) आणि इतर मागासवर्गीय (OBC) श्रेणीतील लोकांना नोंदणी शुल्क म्हणून 850 रुपये भरावे लागतील. दुसरीकडे, SC/ST/PWBD उमेदवारांना 175 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड/मोबाइल वॉलेट/UPI वापरून अर्ज फी भरू शकतात.
युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) भर्ती 2024 निवड प्रक्रिया
स्थानिक बँक अधिकारी म्हणून निवड होण्यासाठी, उमेदवारांना चार-स्तरीय निवड प्रक्रियेतून जावे लागणार आहे. यामध्ये पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार ऑनलाइन परीक्षा, गट चर्चा (आयोजित केल्यास), अर्ज तपासणी आणि/किंवा वैयक्तिक मुलाखत फेरी यांचा समावेश असणार आहे.
लेखी परीक्षा
लेखी परीक्षेच्या पद्धतीमध्ये प्रश्नपत्रिकेत 200 गुणांचे 155 प्रश्न असतील. वस्तुनिष्ठ चाचणीतील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी पेनल्टी (गुण कमी करणे) असणार आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवाराने दिलेल्या चुकीच्या उत्तरासाठी, त्या प्रश्नाला दिलेल्या गुणांमधून एक चतुर्थांश किंवा 0.25 गुण पेनल्टी म्हणून कापले जातील.
या भरतीप्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे. त्यांच्याकरिता केवळ 2 दिवस शिल्लक राहिले असून त्यांनी तात्काळ बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा. अर्जासोबत लागणारे कागदपत्रे ही अर्ज भरताना अपलोड करणे आवश्यक आहे. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट स्वत:कडे ठेवावी.