फोटो सौजन्य - Social Media
स्मॉल इंडस्ट्रीस डेव्हलोपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. असिस्टंट मॅनेजरच्या ग्रेड A पदासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. तसेच मॅनेजर ग्रेड B च्या पदासाठी देखील या भरतीच्या प्रक्रिये माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. एकूण ७२ रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जर तुम्हाला बँकेत काम करायचे आहे किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये रोजगाराच्या शोधात आहात तर या भरतीचा नक्की विचार करा. संपूर्ण भारतभरामध्ये या भरतीच्या प्रक्रियेला आयोजित करण्यात आली आहे. महिला किंवा पुरुष दोन्हीही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना २ डिसेंबरपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाई स्वरूपात करायचे आहे. sidbi.in या लिंकवर जाऊन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : हार्ट अटॅकसारखी परिस्थिती जाणवताच ‘ही’ औषधे खा; किती वेळामध्ये घ्यावे उपचार? जाणून घ्या
नोव्हेंबरच्या ८ तारखेला उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकंदरीत, या भरतीला सुरुवात झाली आहे. याच दिवशी या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. उमेदवारांना २ डिसेंबरपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. दिलेल्या वेळे मर्यादेच्या आत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे. परीक्षा २ टप्प्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे. डिसेंबरच्या २२ तारखेपर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी आयोजित परीक्षेत उपस्थित राहायचे आहे. या परीक्षेचा दुसरा टप्पा १९ जानेवारी २०२५ पर्यंत आयोजित असणार आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज करताना उमेदवारांना हे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी ९२५ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तसेच EWS आणि OBC या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील या भरतीसाठी ९२५ अर्ज शुक्ल भरायचे आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी १७५ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे.
हे देखील वाचा : IOCL मध्ये रोजगाराची संधी; नोकरीसाठी करा अर्ज, जाणून घ्या ‘या’ भरतीविषयी
अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणा संबंधित आहे. तर एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकंदरीत, या सर्व अटी शर्ती अधिसूचनमध्ये नमूद आहेत. ग्रुप A ऑफिसरच्या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर ग्रुप B च्या पदासाठी २५ वर्षे ते ३० वर्षे आयु असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा .