फोटो सौजन्य - Social Media
विद्यापीठ म्हणजे अशी जागा जिथे विद्येचा सागर वाहत असतो. जेथे विद्या मिळवण्यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील असतात. विद्यापीठांची नावे ही तशी भारदस्त आणि वाचून खरंच येर्थे विद्या वाहते का? असे दिसून आले पाहिजे. परंतु, जगभरात अशी काही विद्यापीठे आहेत, ज्यांच्या नावामध्ये असे काही शब्द आहेत, ज्यांना वाचून तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात या अनोख्या नावांची अनोखी विद्यापीठे:
चिकन युनिव्हर्सिटी
चिकन युनिव्हर्सिटी हे नाव ऐकून नक्कीच अनेकांना भूकदेखील लागली असेल. हे विद्यापीठ दक्षिण कोरियात स्थित असून लोकांच्या भुके संबंधितच आहे. जर तुम्हाला फ्राईड चिकन तसेच इतर रेसिपी शिकून या संबंधित व्यवसाय सुरु कारायचे आहे तर तुम्ही या विद्यापीठात भाग घेतला पाहिजे. चिकन युनिव्हर्सिटी फास्ट फूड चेन असून BBQ चा एक ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर आहे.
बॅटमॅन युनिव्हर्सिटी
जर विद्यापीठाचे नाव ‘बॅटमॅन युनिव्हर्सिटी’ असले तरी या विद्यापीठाचा हॉलिवूडच्या बॅटमॅनशी काहीच संबंध नाही. मुळात, हे विद्यापीठ तुर्कीच्या बॅटमॅन शहरात स्थित असल्याने या विद्यापीठाला बॅटमॅन असे नाव देण्यात आले आहे. येथे अभियांत्रिकी, कला आणि विज्ञान, अर्थशास्त्र आणि प्रशासकीय विज्ञान, आरोग्य विज्ञान आणि ललित कला या विषयासंबंधित शिक्षण दिले जाते.
हॅम्बर्गर युनिव्हर्सिटी
McDonald’s ने या विद्यापीठाची सुरुवात केली होती. गेल्या अर्ध्या शतकापासून हे विद्यापीठ फास्ट फूड क्षेत्रात लोकांना ट्रेनिंग देत आहे. हे विद्यापीठ या क्षेत्रातील वर्ल्ड क्लास संस्थान आहे. जगभरातून अनेक विद्यार्थी या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी हॅम्बर्गर युनिव्हर्सिटीचा पर्याय निवडतात.
कोलगेट यूनिवर्सिटी
या विद्यापीठाचा नाव जरी कोलगेट असले तरी या विद्यापीठाचा आणि टूथपेस्ट कोलगेटचा काहीच संबंध नाही. मुळात, या विद्यापीठाला नाव विलियम कोलगेट या प्रसिद्ध व्यावसायिकाच्या नावाने पडले. यांनी या विद्यापीठासाठी मोठी आर्थिक मदत केली. त्यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठाला त्यांचे नाव कोलगेट असे देण्यात आले.
फ्रेंड्स युनिव्हर्सिटी
एक शाळा म्हणून स्थापित करण्यात आलेली ही वास्तू पुढे विद्यापीठ झाली. या विद्यापीठाची निर्मिती रिलिजियस सोसाइटी ऑफ फ्रेंड्सने केली होती. या सोसायटीच्या नावाने या विद्यापीठाला फ्रेंडस असे नाव देण्यात आले.
अशा प्रकारचे अनेक विद्यापीठ जगभरात स्थित आहेत, ज्यांची नावे अनोखी तर काही चित्र विचित्र आहेत. या विद्यापीठांबद्दल अधिक माहिती सोशल मीडियावर हमखास पाहायला मिळते.