बोर्डात मुलांनी कॉपी करू नये म्हणून सीबीएसईचा निर्णय
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये अनुचित मार्ग रोखण्यासाठी कठोर नियम लागू केले आहेत. परीक्षेदरम्यान मोबाईल फोन किंवा कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित असेल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. जर कोणताही विद्यार्थी या नियमांचे उल्लंघन करताना आढळला तर त्याला दोन वर्षांसाठी परीक्षेला बसण्यापासून रोखले जाऊ शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी ही बंदी फक्त एका वर्षासाठी होती.
अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे. तर परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज म्हणाले की, सोशल मीडियावर परीक्षेशी संबंधित अफवा पसरवणे हे देखील अनुचित मार्गांमध्ये समाविष्ट आहे. गेल्या काही वर्षांत, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्या आहेत. यावेळी हे थांबवण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत असेही यावेळी त्यांनी सांगितले. (फोटो सौजन्य – iStock)
सीसीटीव्हीद्वारे देखरेख
यावेळी, परीक्षेत पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आणल्यास किंवा वापरल्यास कठोर कारवाई केली जाईल. मुलांवर कठोर कारवाई केल्यास यामध्ये बदल होणार नाही आणि त्यामुळेच हे पाऊल उचलण्यात आले आहे. तर अनेक पालकांनी यावर हे योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच सीबीएसईची परीक्षा चालू होणार असून विद्यार्थ्यांनी मेहनतीनेच गुण मिळवावेत
पर्यटनाची आवड आहे? पर्यटन क्षेत्रात कसे कराल करिअर? जाणून घ्या
या दिवसापासून बोर्डाच्या परीक्षा सुरू
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. बोर्डाने विद्यार्थ्यांना अनुचित मार्गांपासून दूर राहण्याचा आणि परीक्षा नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. परीक्षांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि निःष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरवर्षी परिक्षेच्या वेळी काही ना काही त्रास उद्भवतो अथवा कॉपी केल्याची प्रकरणेही वाढत आहेत. त्यामुळे या परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये म्हणून कठोरातील कठोर आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आलाय
राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात विवा महाविद्यालयाचा सहभागच; कौशल्याने जिंकले साऱ्यांचे मन
पालकांच्या प्रतिक्रिया
मुलुंड येथे राहणाऱ्या अश्विनी भागवत यांनी यावर सांगितले की, हा CBSC चा योग्य निर्णय असून पालकांना आणि मुलांना धाक राहील आणि अभ्यास केल्याशिवाय काहीच प्राप्त होऊ शकत नाही त्यामुळे हा निर्णय स्वागतार्ह आहे असेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. तर लोअर परेल येथील पालक सुरेखा मलकानी यांच्या म्हणण्याप्रमाणे मुलांच्या आणि पालकांच्या डोक्यात योग्य मार्गाने गुण मिळविण्याचा योग्य आणि संतुलित ताण राहील, त्यामुळे हा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे.