सौजन्य : सोशल मीडिया
युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) च्या स्पर्ध्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. वर्ष २०२५ मध्ये कोणत्या तारखेला कोणत्या परीक्षा घेतल्या जाणार? त्याचबरोबर UPSC संदर्भातील विविध भरतींविषयी सगळ्या तारखा उमेदवारांना जाणता येणार आहेत. UPSC ने २०२५ सालचे वार्षिक कॅलेंडर जाहीर केले आहे. या रिवाईज्ड कॅलेंडर मध्ये UPSC संदर्भातील परीक्षा तसेच भरत्यांसंबंधित तिथी नमूद आहेत. उमेदवारांना या तारखा पाहता येणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे परिस्थितीनुसार या तारखांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता UPSC ने वर्तवली आहे. त्यामुळे UPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी रिवाईज्ड कॅलेंडरमधील नमूद असलेल्या तारखांमध्ये भविष्यात बदलही केला जाऊ शकतो हे मानून चालावे.
हे देखील वाचा: पोलिस दलातील ११ हजार पदांची प्रक्रिया पूर्ण; सप्टेंबरमध्ये देणार प्रशिक्षण
UPSC ने त्यांचे वर्ष २०२५ रिवाईज्ड कॅलेंडर त्यांच्या अधिकृत संकेस्थळावर प्रदर्शित केले आहे. UPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना रिवाईज्ड कॅलेंडर पाहण्यासाठी upsc.gov.in वर जावे लागणार आहे. या संकेतस्थळावर त्यांना UPSC वर्ष २०२५ संदर्भातील सगळी माहिती पुरवली जाणार आहे. UPSC च्या वर्ष २०२५ रिवाईज्ड कॅलेंडर अनुसार, ११ जानेवारी २०२५ रोजी UPSC परीक्षा घेण्यात येणार आहे. तर संयुक्त भू वैज्ञनिक परीक्षा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. इंजिनिअरिंग सेवा परीक्षा, २०२५ ची सुरुवात फेब्रुवारी २०२५ च्या ९ तारखेला होणार असून सीबीआई (डीएसपी) एलडीसीई परीक्षा 8 मार्च, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत १४ जानेवारी २०२५ पर्यंत असणार आहे.
CISF AC(EXE) LDCE-२०२५ संदर्भात अधिसूचना ४ डिसेंबर, २०२४ रोजी जाहीर होणार असून परीक्षा 9 मार्च, २०२५ पासून घेण्यात येणार आहे. २४ डिसेंबर, २०२४ पर्यंत या परीक्षेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. एन.डी.ए. आणि एन.ए. परीक्षा (I) तसेच सी.डी.एस. परीक्षा (I), २०२५ संदर्भातही माहिती जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेसंदभात अधिसूचना ११ डिसेंबर २०२४ ला जाहीर होणार असून एप्रिल २०२५ च्या १३ तारखेपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे.
याचबरोबर UPSC संदर्भातील सर्व परीक्षांची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख, अर्ज करण्याची मुदत तसेच परीक्षेसंदर्भात तारखा या रिवाईज्ड कॅलेंडरमध्ये नमूद केले गेले आहे. यानाद्दल अधिक माहितीसाठी उमेदवारांनी UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन रिवाईज्ड कॅलेंडर पाहून घयावे.