फौटो सौजन्य- iStock
प्रत्येक कर्मचारी हा पगाराची चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत असतो. मग तो कर्मचारी कोणताही असुदे पगार महत्वाचा ठरतो. मात्र कर्मचाऱ्यासाठी फक्त पगारच महत्वाचा असतो असे नाही. नुकत्याच आलेल्या सर्वेक्षणामध्ये 10 पैकी 8 कर्मचारी पगारापेक्षा त्यांच्या कामाच्या गुणवत्तेला अधिक महत्त्व देत असल्याचे कळले आहे. कर्मचारी त्यांच्या कामात कोणत्या प्रकारचे कौशल्य वापरले जाते यासाठी महत्व देत आहेत. ज्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला अधिक महत्त्व दिले जाते त्याठिकाणी कर्मचारी टिकून राहण्याची शक्यता जास्त असते किंवा कर्मचारी तेथे टिकून राहतात. EY आणि iMocha यांच्या अहवालात कर्मचाऱ्यांबद्दल ही बाब समोर आली आहे.
भारत ब्रिटन युरोप आणि आखाती देशातील कर्मचाऱ्यांचा सहभाग
EY आणि iMocha च्या अहवालानुसार, कर्मचाऱ्यांवरील सर्वेक्षणातून असे दिसून आले की, गुणवत्तेला महत्त्व दिल्याने कर्मचाऱ्यांवर सकारात्मक परिणाम झाला आहे असे 63 टक्के एचआरला असे आढळून आले आहे. यासोबतच, स्किल फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन (SFT) सारख्या उपक्रमांचा कर्मचाऱ्यांवर अधिक सकारात्मक परिणाम झाला आहे. ईवायचा हा अहवाल एकूण 1775 कंपन्यांमधील 240 एचआर लीडर्स आणि 340 कर्मचाऱ्यांशी बोलून हा तयार करण्यात आला आहे. या अहवालामधील सर्वेक्षणात अमेरिका, भारत, ब्रिटन, युरोप आणि आखाती देशांतील कर्मचाऱ्यांशी सहभाग घेतला.
कामकाजावर होतो सकारात्मक परिणाम
या अहवालातून एक महत्वाची बाब समोर आली की, आजच्या काळात पारंपारिक पध्दतीने केलेेल्या कामगार बदलांमुळे काही वेळा कौशल्यांना तितकेसे प्राधान्य मिळत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत कंपनीच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो. मात्र कंपनी जर कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला महत्त्व देते तर कंपनीचे चांगले व्यवस्थापन करण्यासही मदत होते. यामुळे कंपनीच्या निकालामध्ये 5 पट सुधारणा होण्याची शक्यता आहे. अहवालात, कर्मचाऱ्यांच्या परिवर्तनादरम्यान होणाऱ्या खर्चाला अनेकदा कमी लेखले जाते. अशा स्थितीत खर्चात 3 ते 10 पट फरक दिसून येतो.
ज्यावेळी कंपन्या नवीन भरती करतात त्यावेळी कंपन्यांनी कौशल्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचेही या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. हे कंपन्यांना त्यांच्या वास्तविक खर्च समजून घेऊन चांगल्या लोकांना कामावर घेण्यास मदत करेल. कर्मचार कौशल्याला अधिक महत्व देत असल्याने त्यांच्या कौशल्य विकासासाठी कंपनीकडून प्रयत्न करणे अपेक्षित आहे.