फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्ही नोकरीसाठी परराज्यात जाण्यास तयार आहात. तर या संधीचे नक्की सोने करा. गुजरात राज्य प्राथमिक शिक्षण निवड समितीने या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर उद्या शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकर निर्णय घेऊन अर्ज करण्यास सुरुवात करावी. एकंदरीत, अर्ज करण्या अगोदर या भरती संबंधित जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीचा आढावा घ्यावा. या जाहिरातीमध्ये या भरती संबंधित सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. गुजरात राज्य प्राथमिक शिक्षण निवड समितीमध्ये सहाय्यक शिक्षक पदासाठी भरती आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांना 16 नोव्हेंबर 2024 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकूण 13,852 रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. गुजरात राज्य प्राथमिक शिक्षण निवड समितीच्या vsb.dpegujarat.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
इयत्ता पहिली ते पाचवी दरम्यानच्या वर्गात शिकवण्यासाठी सहाय्यक शिक्षक पदासाठी एकूण 5,000 उमेदवारांची गरज भासत आहे. तर इयत्ता सहावी ते आठवी दरम्यानच्या वर्गासाठी सहाय्यक शिक्षक पदासाठी एकूण 7,000 उमेदवारांची गरज भासत आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही अटींना पात्र करणे अनिवार्य आहे. दरम्यान ही भरती पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी अशा दोन वर्गात विभागली केली आहे.
इयत्ता पहिली ते पाचवी वर्गांसाठी सहाय्यक शिक्षक पदाचा रिक्त जागांसाठी अर्ज करता उमेदवार बारावी उत्तीर्ण हवा. तसेच उमेदवाराने दोन वर्षांचा D.EI.Ed हा कोर्स पूर्ण केला हवा. तसेच इयत्ता सहावी ते आठवी वर्गांसाठी सहाय्यक शिक्षक पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे डी.एल.एड किंवा बी एड पदवीचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी किमान 18 वर्षे आयु असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तर जास्तच जास्त 33 वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना भरती मध्ये सहभाग घेण्यास मुभा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करताना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. सामान्य श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. ओबीसी या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना देखील सारखीच रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरायचे आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या काही घटकांना अर्ज शुल्कात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. SC तसेच ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्काची रक्कम म्हणून भरायचे आहे.
या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 22,000 ते 25,000 रुपये दरमहा वेतन म्हणून मिळण्याचे शक्यता आहे. तर चार टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे. पहिली स्क्रीनिंग चाचणी घेण्यात येईल. तसेच लेखी परीक्षा, दस्तऐवजांची पडताळणी आणि अंतिम गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.