फोटो सौजन्य - Social Media
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरने Non-Teaching भरती 2024 साठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे डेप्युटेशन, नियमित आणि कंत्राटी पद्धतीने विविध पदांसाठी नियुक्त्या होणार आहेत. यामध्ये वरिष्ठ अधीक्षक अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी आणि इतर महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता सुरू होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे.
एकूण ३४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मुळात, या भरतीमध्ये नियुक्तीस पात्र उमेदवाराची पोस्टिंग कानपूर येथे होणार आहे. IIT कानपूरमध्ये Non-Teaching भरती अंतर्गत अनेक पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. यामध्ये Senior Superintending Engineer पदासाठी 1 जागा (UR) राखीव आहे, तर Superintending Engineer साठी 2 जागा (1 SC, 1 UR) आहेत. Deputy Registrar या पदासाठी 2 जागा (1 ST, 1 OBC) उपलब्ध आहेत, आणि Executive Engineer साठी 2 जागा (1 SC, 1 OBC) भरल्या जाणार आहेत.
Assistant Counselor पदासाठी 3 जागा (2 OBC, 1 EWS), तसेच Assistant Registrar पदासाठी 1 जागा (PWD) व Assistant Registrar (Library) साठी 1 जागा (OBC) आहे. Hall Management Officer या पदासाठी 1 जागा (SC) असून, Medical Officer पदासाठी 2 जागा (1 ST, 1 PWD) राखीव आहेत. याशिवाय, Assistant Security Officer साठी 2 जागा (1 SC, 1 UR), Assistant Sports Officer साठी 2 जागा (UR), आणि Junior Technical Superintendent पदासाठी 3 जागा (1 SC, 2 UR) उपलब्ध आहेत. Junior Assistant या पदासाठी सर्वाधिक 12 जागा (2 PWD, 1 EWS, 9 UR) भरल्या जाणार आहेत.
कनिष्ठ अभियंताच्या पदासाठी ५७ वर्षे खालील आयु निश्चित करण्यात आली आहे. डेप्युटी रजिस्टारच्या पदासाठी २१ वर्षे ते ५० वर्षे आयुगट असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करू शकतात. असिस्टंट कौन्सिलर २१ पदासाठी वर्षे ते ४५ वर्षे आयुगट उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचा.
सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि नामांकित संस्थेमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम IIT कानपूरच्या अधिकृत भरती पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणी पूर्ण केल्यानंतर, उमेदवारांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. यामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करणेही बंधनकारक आहे. अर्ज अंतिम तारखेपूर्वी, म्हणजेच 31 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत सबमिट करावा.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि अटी-शर्ती समजून घेण्यासाठी IIT कानपूरच्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे. सरकारी क्षेत्रातील प्रतिष्ठित नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.