विवा महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स कार्यशाळा; विद्यार्थांचा भरघोस प्रतिसाद...
विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या भास्कर वामन ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स, यशवंत केशव पाटील कॉलेज ऑफ कॉमर्स, विद्या दयानंद पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स विवा महाविद्यालय व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा दिनांक २४ ऑगस्ट आणि ७ ऑक्टोबर २०२४ रोजी कार्यशाळा आयोजित केली होती.
गेट सेट गो वर्ल्डच्या सहकार्याने आर्टिफिशियल इंटेलिजियन्स ( AI) द्वारे संशोधन आणि अध्यापनात प्राध्यापकांची प्रगती व गुणवत्ता वाढवण्यासाठी “हाऊ कॅन एआय हेल्प यू फॉर रिसर्च अँड टीचिंग पेडागॉजी” या शीर्षका अंतर्गत कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले. या कार्यशाळेत संजय रहाटे आणि डॉ. दिलीप एस. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यशाळेत AI जागरूकता, शिक्षणात AI च्या व्यावहारिक उपयोगांवर चर्चा, शिक्षकांना AI साधनांसह प्रभावी अध्यापन योजना आणि आकर्षक आशय सामग्री तयार करण्यात मदत करणे इत्यादी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. चर्चेसोबत पाहुण्यांनी AI टूल वापरून प्रात्यक्षिके करून दाखवली.
हे देखील वाचा – भारतीय रेल्वेत स्पेशल भरती; क्रीडा क्षेत्रातील उमेदवारांना करता येईल अर्ज
ChatGPT, Humanize.ai, साहित्याची चोरी तपासणे, Ideogram, Photo Enhancer, आणि Xmind सारखी साधने यांचा अभ्यास प्रात्यक्षिके च्या माध्यमातून करण्यात आले. अध्याय आणि पुस्तक लेखनात AI वापरण्याचे तंत्र अन् त्याचे महत्व ऑनलाईन पद्धतीने दाखविण्यात आले. या कार्यशाळेला मिळालेला अभिप्राय कमालीचा सकारात्मक होता. शिक्षकांनी सादर केलेल्या व्यावहारिक अंतर्दृष्टी आणि साधनांचे कौतुक केले गेले.
या कार्यशाळेमुळे शिक्षकांना AI च्या मदतीने अध्यापनात विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून नवीन साहित्य निर्माण करण्यास तसेच स्वकौशल्याचा विकास करून व्यावहारिक जीवनात नक्कीच सकारात्मक प्रगतिशील दिशा प्राप्त करण्यास सहाय्यक ठरेल हा विश्वास या कार्यशाळेतून पाहुण्यांनी उपस्थितांना दिला. या कार्यशाळेचे नियोजन महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक व उप प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, सह समन्वयक डॉ. रोहन गवाणकर, प्राध्यापक वर्ग यांनी केले.
या कार्यशाळेला महाविद्यालयाचे ट्रस्ट अध्यक्ष श्री हितेंद्रजी ठाकूर, ट्रस्टच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, प्राचार्य डॉ.वी.श.अडिगल, उपप्राचार्य डॉ. प्राजक्ता परांजपे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.