Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्यटन क्षेत्रात करिअर करायचंय? संध्या अमाप, शिका सोनं करायचे कसे?

पर्यटन क्षेत्रात रोजगार आणि उद्योजकतेच्या अफाट संधी उपलब्ध होत आहेत. लोकांशी संवाद साधायला आवडत असेल तर हे तुमच्यासाठी उत्तम करिअर ठरू शकतं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 24, 2025 | 08:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आज पर्यटनाचा चेहरामोहरा बदलत चाललाय. पूर्वी फक्त किल्ले, किल्ल्यांचे अवशेष, स्मारकं पाहणं हा पर्यटनाचा उद्देश असायचा. पण आता पर्यटक वेगळा अनुभव शोधत आहेत. अध्यात्मिक आणि धार्मिक पर्यटनासोबतच रिजेनरेटिव्ह टुरिझम, क्युरेटिव्ह टुरिझम, होमस्टे, फूड वॉक, स्थानिक कुकिंग क्लासेस यांचा क्रेझ झपाट्याने वाढतो आहे. पर्यटकांना फक्त फिरणं नको, तर स्थानिक संस्कृती आणि जीवनशैली जवळून अनुभवायची आहे.

LIC HFL अप्रेंटिस भरती 2025 : 192 पदांसाठी संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

यामुळे तरुणांसाठी या क्षेत्रात रोजगार आणि स्वरोजगार दोन्ही संधी उपलब्ध झाल्या आहेत. काही तरुण आपल्या शहरात फूड वॉक, शॉपिंग टूर, स्थानिक खाद्यसंस्कृतीची सफर घडवून आणत आहेत. कुणी धार्मिक स्थळांसाठी ग्रुप टूर आयोजित करत आहेत तर कुणी मनाली, शिमला, गोवा किंवा कोकण किनाऱ्यावर खास पॅकेजेस देत आहेत. यामुळे केवळ पर्यटकांनाच अनुभव मिळत नाही, तर स्थानिकांनाही रोजगाराची संधी मिळते.

या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर स्टोरीटेलिंगची कला येणं गरजेचं आहे. पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासोबत त्यांचं मन जिंकणं महत्त्वाचं ठरतं. टूर गाईड, टूर प्लॅनर, ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल-रेस्टॉरंट, रिसॉर्ट मॅनेजमेंट अशा अनेक मार्गांनी करिअर घडवता येऊ शकतं. शिवाय पार्ट-टाईम जॉब्सचीही संधी आहे, जसं की स्वतःचं घर होमस्टेसाठी उपलब्ध करून देणं किंवा डिजिटल मार्केटिंग सेवा पुरवणं.

पर्यटन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी बीए टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटसारखे कोर्सेस अनेक विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. दिल्ली युनिव्हर्सिटी, जामिया मिलिया इस्लामिया, आयआयटीटीएम (Indian Institute of Tourism and Travel Management) आणि इग्नू ही काही प्रमुख संस्था आहेत.

आज भारतात घरगुती पर्यटन वेगाने वाढत आहे. अयोध्या राममंदिर, काशीधाम, महाकाल, तसेच क्रूझ टुरिझम यांसारख्या नवीन संकल्पनांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहेत. सरकारही या क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. म्हणूनच पर्यटन क्षेत्र हे उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी उत्तम व्यासपीठ ठरत आहे.

OFBL च्या संधीला मुकू नका! आज शेवटची तारीख… इच्छा असेल तर ताबडतोब घ्या Action

एकंदरीत, जर तुम्हाला लोकांशी संवाद साधायला, फिरायला आणि नवीन अनुभव द्यायला आवडत असेल, तर पर्यटन क्षेत्र तुमच्यासाठी सर्वोत्तम करिअर पर्याय ठरू शकतो.

Web Title: Want to do career in tourism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 08:33 PM

Topics:  

  • Maharashtra Tourism

संबंधित बातम्या

Matheran News : पालिकेचे लाल मातीच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष; घोडेस्वारांनी भरले खड्डे
1

Matheran News : पालिकेचे लाल मातीच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष; घोडेस्वारांनी भरले खड्डे

Bhayander News :  नसतं धाडस आलं अंगाशी; पोहायला गेला आणि मृतदेह वाहत आला, चेना नदीत एकाचा बुडून मृत्यू
2

Bhayander News : नसतं धाडस आलं अंगाशी; पोहायला गेला आणि मृतदेह वाहत आला, चेना नदीत एकाचा बुडून मृत्यू

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा…; मुख्य सचिवांनी दिले आदेश
3

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा…; मुख्य सचिवांनी दिले आदेश

Maharashtra Day: महाराष्ट्र दिन आणि आपल्या दुर्लक्षित खजिन्यांची आठवण…
4

Maharashtra Day: महाराष्ट्र दिन आणि आपल्या दुर्लक्षित खजिन्यांची आठवण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.