फोटो सौजन्य - Social Media
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) तर्फे अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 192 रिक्त पदे उपलब्ध असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून, उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी nats.education.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
ऑनलाइन परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवारच पुढे अप्रेंटिस पदासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे ही परीक्षा उमेदवारांसाठी अत्यंत निर्णायक आहे. योग्य वेळ व्यवस्थापन, सराव चाचण्या आणि मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास यामुळे यशाची शक्यता वाढू शकते. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना आपली सर्व माहिती अचूक भरावी. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. तसेच, अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करणे हितावह ठरेल.
अर्ज प्रक्रिया : LIC HFL Apprentice Recruitment 2025






