फोटो सौजन्य - Social Media
बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अनेक प्रश्न असतात. बँकिंग क्षेत्रात करिअर कसे करावे? बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी कोणते कोर्सेस करावे लागतात? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. मुळात, विद्यार्थ्यांची बारावी झाली कि असे प्रश्न पडण्यास सुरुवात होतात. खाली अशा काही महत्त्वाच्या कोर्सेसची माहिती दिली आहे जी या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
बँकिंग आणि फायनान्समध्ये डिप्लोमा/पदवी (Diploma/Degree in Banking and Finance)
जर तुम्हाला बँकिंगच्या मूलभूत संकल्पना, आर्थिक व्यवस्थापन, लेखापाल तपासणी (Auditing), आणि बँकिंग प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर बँकिंग आणि फायनान्स विषयावर डिप्लोमा किंवा पदवी मिळवणे कधीही बेहत्तर आहे. हे कोर्सेस अनेक विद्यापीठे आणि संस्थांद्वारे ऑफर केले जातात. दरवर्षी अनेक भारतीय विद्यार्थी हे कोर्सेस करतात.
चार्टर्ड अकाउंटंट (CA)
चार्टर्ड अकाउंटंट देशातील एक प्रतिष्ठित व्यवसायांपैकी एक आहे. CA ची परीक्षाही देशातील एक कठीण परीक्षा मानली जाते. या क्षेत्रात आर्थिक व्यवस्थापन, लेखापाल तपासणी, आणि कायदेशीर बाबतींचा अभ्यास करावा लागतो. बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ पदांसाठी ही पदवी फायदेशीर ठरते.
MBA इन फायनान्स (MBA in Finance)
BBA झाल्यावर जास्तकरून विद्यार्थी MBA करण्याचा विचार करतात. MBA इन फायनान्स केल्याने बँकिंग क्षेत्रात करिअरची दार उघडतात. या कोर्समध्ये विद्यार्थ्याला आर्थिक नियोजन कसे करावे? या संबंधित माहिती मिळते. तसेच गुंतवणूक व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन (Risk Management), आणि धोरणात्मक निर्णय घेण्याचे कौशल्य शिकवले जाते.
JAIIB आणि CAIIB
भारतीय बँकिंग आणि वित्तीय संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हे कोर्सेस अत्यंत महत्त्वाचे आहेत. JAIIB बँकिंगचे मूलभूत ज्ञान देते, तर CAIIB व्यावसायिक कौशल्ये आणि आर्थिक विश्लेषण शिकवते.
डिजिटल बँकिंग आणि फायनान्स सर्टिफिकेशन
सध्याच्या युगात डिजिटल करंसीचा प्रभाव वाढत आहे. तसेच डिजिटल करन्सी भविष्य असल्याचे अनेक जणांचे सांगणे आहे. तर या तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे डिजिटल बँकिंगमध्ये कौशल्य असणे आवश्यक आहे.
देशात दरवर्षी बँकिंग क्षेत्रासंबंधित अनेक परीक्षा आयोजित केल्या जातात. दरवर्षी अनेक उमेदवार या परीक्षांसाठी उपस्थित राहतात. IBPS, SBI PO/Clerk, RBI Grade B सारख्या बँकिंग परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विशेष कोचिंग कोर्सेस करणे उपयुक्त ठरते.
डिप्लोमा इन इंटरनॅशनल बँकिंग आणि फायनान्स
जागतिक बँकिंग प्रक्रियांचे ज्ञान मिळवण्यासाठी हा कोर्स उपयुक्त ठरतो. जर तुम्हला बँकिंग क्षेत्रात जागतिक स्तरावर काम करायचे किंवा करिअर घडवण्यासाठी बाहेर देशात जायचे आहे तर हा कोर्स करणे अगदी उत्तम पर्याय आहे.