फोटो सौजन्य - Social Media
एचडीएफसी बँकेने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासंबंधित अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती होत असून HDFC तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी अधिसूचनेमध्ये जाहीर पात्रता निकष वाचून घ्यावे. तसेच संपूर्ण अधिसूचनेचा आढावा घेताच अर्ज करावे. उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचे आहे.
HDFC बँकेच्या या भरतीमध्ये रिलेशनशिप मॅनेजर – प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदाच्या रिक्त जागांचा विचार करण्यात येणार आहे. या भरतीसाठी किती जागा रिक्त आहेत? याची संख्या अद्याप जाहीर करण्यात आली नाही. परंतु, या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांनी ३० डिसेंबर २०२४ पासून या भरतीसाठी अर्ज करण्याचे सुरु केले आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या मुदती दरम्यान अर्ज करण्याची विंडो खुली असणार आहे. तर नियुक्तीसाठी उमेदवारांना परीक्षेस उपस्थित राहावे लागणार असून परीक्षा पात्र करावी लागणार आहे. मार्च २०२५ मध्ये परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. प्रवेशपात्र परीक्षेच्या काही दिवसांआधी उपलब्ध करून देण्यात येईल.
अधिसूचनेमध्ये काही पात्रता निकष नमूद आहेत. उमेदवारांना या अटी शर्ती पात्र कराव्या लागणार आहेत. एकंदरीत, तरच उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज कर्ता उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे अनिवार्य आहे. अट मात्र एक कि उमेदवार किमान 50% गुणांसह (मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालय) पदवीधर असावा. तसेच उमेदवाराने SSC तसेच HSC च्या परीक्षेत किमान ५०% गुण मिळवले असावे. विक्री (Sales) क्षेत्रातील 1 ते 10 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य या भरतीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी किमान वय 18 वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. तसेच कमाल वय ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
HDFC बँकेच्या निवड प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश आहे:
अर्ज करण्या अगोदर खालील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे: