फोटो सौजन्य - Social Media
सरकारी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या शोधामध्ये आहात. तर हा लेख नक्कीच तुमच्या उपयोगी पडणार आहे. गेल्या काही दिवसात सरकारी क्षेत्रामध्ये अनके रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सरकारी क्षेत्रामध्ये अनेक रोजगाराच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे त्यातील अनेक भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत संपत आली आहे. परंतु, वेळ अद्याप गेली नाही आहे. जर कुणाला यातील कोणत्याही भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याची इच्छा आहे, तर ते अजूनही करता येऊ शकते.
हे देखील वाचा : कोकण रेल्वेमध्ये 190 जागांसाठी भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांना प्राधान्य, आजपासून करता येणार अर्ज
हाय कोर्टामध्ये चपराशी भरतीसाठी सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे ही भरती प्रक्रिया पंजाब तसेच हरियाणा येथील उच्च न्यायालयासाठी आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणारे विद्यार्थी किमान १२ उत्तीर्ण असावेत. २० सप्टेंबर २०२४ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी तसेच अधिसूचना मिळवण्यासाठी उमेदवारांनी highcourtchd.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
जर तुम्हाला भारतीय नौदलामध्ये भरती होण्याची इच्छा आहे, तर नक्कीच या भरती प्रक्रियेचा लाभ घ्या. भारतीय नौदलाने काही दिवसांपूर्वी मेडिकल असिस्टंट पदासाठी भरतीला सुरुवात केली होती. या भरतीसाठी इच्छुक असणारे उमेदवार भारतीय नौदलाच्या www.joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करत आहेत.
जर आपण युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) मध्ये काम करू इच्छुक आहात तर कंबाइंड जियो साइंटिस्ट एग्जामिनेशन २०२५ या व्हॅकन्सीबद्दल नक्कीच जाणून घ्या. २० सप्टेंबर २०२४ तारखेपर्यंत या भरतीसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. तर २५ सप्टेंबर पासून ते १ ऑक्टोबरपर्यंत अर्जात सुधार करण्याची मुभा देण्यात आली आहे. या भरतीच्या सखोल माहितीसाठी UPSC ने जाहीर केलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
हे देखील वाचा : सरकारी नोकरी: भारत सरकारच्या IWAI कंपनीमध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !
युनिअन बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एकूण ५०० रिक्त पदांना भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. मुळात सप्टेंबरच्या १७ तारखेपर्यंत या भरतीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.