कोकण रेल्वे कॉरपोरेशन लिमिटेडमधील विविध पदांसाठी असणाऱ्या भरतीची आजपासून अर्जप्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ही भरतीप्रक्रिया सुवर्णसंधी आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना भरतीप्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे ते 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. जाणून घेऊया या भरतीविषयी
पदे आणि जागा
एकूण जागा- या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांसाठी तब्बल 190 जागा उपलब्ध आहेत.
पदे –
वेतन- विविध पदानुसार 18 हजार ते 44 हजार 900 रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे.
पात्रता निकष
वयोमर्यादा
या भरतीसाठीची उमेदवाराचे वय हे 18 ते 36 वर्षामध्ये असावे. 1 ऑगस्ट 2024 पासून वयाची गणना केली जाईल. इतर प्रवर्गांना शासनाच्या नियमांनुसार वयात सवलत दिली गेली आहे.
अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची शेवटची तारीख
आज दि. 16 सप्टेंबरपासून उमेदवार अर्ज भरु शकतात. या अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 6 ऑक्टोबर आहे. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11.59 पर्यंत अर्ज करु शकता. त्यानंतर अर्ज करता येणार नाही. उमेदवाराने शक्य तितक्या लवकर अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी उमेदवाराने नोटिफिकेशन पाहावे.
नोटिफिकेशन करिता इथे क्लिक करा.