फोटो सौजन्य - Social Media
वैद्यकीय क्षेत्रात MBBS पदवीला एक विशेष स्थान आहे. भारतामध्ये MBBS करून वैद्यकीय क्षेत्रात मोठे नाव करण्याचे स्वप्न बहुतेक मुलं वयाच्या अगदी लहानपणातच पाहत असतात. काही विद्यार्थी असे असतात, जे MBBS ला सर्वस्व मानून चालत असतात. भारतात MBBS मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) उत्तीर्ण करावी लागते. महत्वाची बाब म्हणजे काही विद्यार्थी अगदी नववी- दहावीत असताना NEETच्या तयारीला सुरुवात करतात. दिवसरात्र मेहनत घेत असतात. MBBSचे शिक्षण घेण्यामध्ये जितकी रक्कम जाते तेवढी ती परतही येते, कारण MBBS ला वैद्यकीय क्षेत्रातील हाय सॅलरी पर्याय म्हणून ओळखले जाते.
जरी MBBS वैद्यकीय क्षेत्रातील असा पर्याय असला ज्यात कमवण्याची संधी इतर वैद्यकीय क्षेत्रातील पर्यायांच्या तूलनेत जरा जास्त असते, तरी इतर क्षेत्रातही MBBS इतकी सॅलरी मिळण्याच्या अनेक संध्या असतात. काही वेळा विद्यार्थी NEET च्या तयारीत जास्त कष्ट घेऊनही काही गुणांसाठी मागे पडतात आणि निराश होतात. परंतु, असे घडले तर निराश होण्याची मुळीच गरज नाही. कारण वैद्यकीय क्षेत्रातील काही विकल्प असे आहेत जे MBBS इतकीच हाय सॅलरी प्रदान करते. चला तर मग जाणून घेऊया अशा विकल्पांबद्दल:
हे सुद्धा वाचा : MBBS आहात पण सरकारी क्षेत्रात घेताय नोकरीचा शोध? AIIMS ची दमदार व्हॅकन्सी
फार्मेसी
फार्मेसी ४ वर्षांची डिग्री असून वैद्यकीय क्षेत्राच्या संबंधित आहे. फार्मेसी करण्यास इच्छुक असणारे विद्यार्थी मास्टर ऑफ फार्मेसी (M.Pharma) , बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharma) तसेच डिप्लोमा इन फार्मेसी करू शकता. या क्षेत्रात २.५ लाखांपासून ते १० लाखांपर्यंत पगार मिळण्याची शक्यता असते. तसेच या कोर्सच्या पूर्ततेनंतर क्लिनिकल फार्मेसिस्ट, फार्मेसी डायरेक्टर किंवा ड्रग्स इंस्पेक्टर म्हणून आपले करिअर घडवू शकता.
डेंटिस्ट
वैद्यकीय क्षेत्रातही विविध विभाग असतात. वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळे डॉक्टर असतात. त्याचप्रमाणे दातांचे डॉक्टर इतर डॉक्टरपेक्षा वेगळे असतात. जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छुक आहात तर एकदा डेंटिस्ट बनण्याचा विचार करून तर पाहा. या क्षेत्रात सुरुवातीची सॅलरी १.८ लाख ते ५ लाखांच्या दरम्यान असू शकते जी पुढे जाऊन १२ लाखांपर्यंत पोहचू शकते. त्याचबरोबर स्वतःचा दवाखाना उघडणेही फायद्याचे ठरू शकते.
मेडिकल इमेजिंग टेक्निक
मेडिकल इमेजिंग टेक्निकमध्ये आपले करिअर घडवण्यासाठी B.Sc MIT करावे लागते. या कोर्समार्फत विद्यार्थ्यांना ईसीजी (ECG), एमआरआई (MRI), सीटी स्कैन (CT SCAN), एक्स-रे (X-RAY) तसेच रेडिओलॉजी संदर्भातील अनेक गोष्टी शिकता येतात. विशेष म्हणजे एखादा अनुभवी रेडिओलॉजिट्स महिन्याला ५०,००० ते ६०,००० आरामात कमवू शकतो.
त्याचबरोबर नर्सिंग, डिकल डायरेक्टर, क्लीनिकल मॅनेजर, रिसर्च मॅनेजर, हॉस्पिटल एडमिनिस्ट्रेटरसारख्या पदांची तयारी करून चांगल्या रकमेत स्वतःला खेळवत ठेऊ शकता. तसेच वैद्यकीय क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकता.