Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: कोकणात गणेशभक्तांच्या वाहनाचा चक्काचूर; ८ ते १० जण गंभीर, गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघाले अन् …

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईहून कोकणातील गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनाचा रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. राजापूरमधील हातिवले येथे झालेल्या दुर्घटनेत ८ ते १० प्रवासी गंभीर जखमी झाले असून, सुदैवाने अद्याप जीवितहानीचे वृत्त नाही.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 13, 2026 | 03:21 PM
Accident News: कोकणात गणेशभक्तांच्या वाहनाचा चक्काचूर; ८ ते १० जण गंभीर, गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघाले अन् ...

Accident News: कोकणात गणेशभक्तांच्या वाहनाचा चक्काचूर; ८ ते १० जण गंभीर, गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघाले अन् ...

Follow Us
Follow Us:
  • हातिवले येथे फोर्स अर्बेनिया वाहनाचा भीषण अपघात
  • सुमारे १५ प्रवासी वाहनातून प्रवास करत असल्याची माहिती
  • अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट पोलिसांकडून पंचनामा आणि तपास सुरू
रत्नागिरी: गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोकणातील आपल्या गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनाचा रविवारी सकाळी राजापूर तालुक्यात भीषण अपघात झाला. हातिवले येथील अंकिता पॅलेससमोर झालेल्या या दुर्घटनेत फोर्स अर्बेनिया वाहनातील ८ ते १० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची तीव्रता वाहनाच्या झालेल्या अवस्थेवरून दिसून येत आहे. सुदैवाने या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार, हे प्रवासी मुंबईहून गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या गावी निघाले होते. वाहनातून सुमारे १५ जण प्रवास करत होते. रविवारी सकाळी राजापूर तालुक्यातील हातिवले येथे वाहनाला भीषण अपघात झाला. अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा:Accident News: गणेशोत्सवाच्या प्रवासाला वरंधा घाटात अपघाताचे गालबोट; दोन कारचा चक्काचूर,तिघे गंभीर 

स्थानिक तरुणांकडून मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमी प्रवाशांना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, वाहनावरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास केला जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा:‘मनःशांती मिळाली’ म्हणत पत्नीने पतीला संपवलं; पतीची हत्या अन् मृतदेहाची चिरफाड, काढलेले अवयव देवीला अर्पण करून तिला… 

गणेशोत्सवामुळे महामार्गावर गर्दी

सोमवारी (१४ सप्टेंबर) गणेश चतुर्थी असल्याने गणेशभक्त मोठ्या संख्येने मुंबई, पुणे आणि नाशिकसह विविध भागांतून कोकणाकडे रवाना झाले आहेत. कोकणातील अनेक कुटुंबांमध्ये गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असल्याने दरवर्षी लाखो चाकरमानी गणपतीसाठी आपल्या गावी जातात. यंदाही मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. इंदापूर आणि माणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, सुमारे १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत असल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ते वाहतुकीसोबतच कोकणाकडे जाणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंब होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. गणेशोत्सवाच्या उत्साहात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाला राजापूर येथील या अपघातामुळे गालबोट लागले आहे.

Web Title: 10 ganesh devotees seriously injured in an accident at rajapur while travelling from mumbai to their village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 03:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.